अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थींचे कृष्णा वारणेच्या संगमात विसर्जन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

सांगली - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे आज सांगलीपासून जवळच असलेल्या हरिपूर येथील कृष्णा वारणेच्या संगमात शोकाकूल वातावरणात विसर्जन करण्यात आले.

वाजपेयींचा अस्थिकलश गुरूवारी सांगलीत आला होता. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयात अस्थीकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, महापौर, उपमहापौर, जिल्हा परिषद अध्यक्षांसह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी अस्थींचे दर्शन घेतले. आज सकाळी सजवलेल्या वाहनात अस्थिकलश ठेवून सांगलीतून यात्रा काढण्यात आली. 

हरीपूरमध्ये संगमेश्वर मंदिराजवळ असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर काहीवेळ अस्थिकलश ठेवण्यात आला. त्यानंतर कृष्णा वारणा नद्यांच्या संगमात अस्थींचे शोकाकूल वातावरणात विसर्जन करण्यात आले.

Web Title: Atal Bihari Vajpayee's mortal remains in krishna river