लोणी काळभोर येथे लवकरच 'अटल इनक्यूबेशन सेंटर'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

लोणी काळभोर - अटल इनोव्हेशन मिशन अभियानांतर्गत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठात अटल इनक्यूबेशन सेंटरची लवकरच सुरुवात होणार आहे. 'अटल न्यू इंडिया चॅलेंजेर्स' या कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रांमधील आव्हानांना तोंड देण्यासाठी अभिनव उत्पादने आणि उपाययोजनांसाठी नवतंत्रज्ञान निर्माण करणाऱ्यांना एक कोटी रुपयांचा अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती अटल इनोव्हेशन मिशनचे (नीती आयोग) संचालक आर रमनन यांनी दिली.       

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या राज मेमोरियल येथे सोमवारी (ता. ४) झालेल्या अटल इनोव्हेशन मिशन अभियानांतर्गत 'अटल न्यू इंडिया चॅलेंजेर्स' या कार्यक्रमात रमनन बोलत होते. यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, एमआयटी स्कूल ऑल इंजिनिअरींगचे प्राचार्य प्रा. डॉ. किशोर रवांडे, एआयसी एमआयटी एडीटी इंन्क्युबेटर फोरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. सुजीत फुंदे, एमआयटी टीबीआय कोथरुडचे प्रा. रवी बिरजे, प्रा. प्रदीप डांगे, डॉ. अशिष पानत, संतोष सरदेशमुख उपस्थित होते.

यावेळी आर रमनन म्हणाले,"भारत हा विकसनशील देश असल्यामुळे येथील तरुणांना अनेक क्षेत्रात आपली बुध्दिमत्ता वापरून नवतंत्रज्ञानाची निर्मिती करणे शक्य आहे. त्यासाठी टल न्यू इंडिया चॅलेंज' कार्यक्रमाअंतर्गत तरुणांच्या बुद्धीमत्तेचा वापर करून 
देशातील मोठ्यात मोठी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अटल इनोव्हेशन मिशन पाच केंद्रीय मंत्रालयाच्या सहकार्याने चालविला जात आहे. त्यामुळे देशात जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान निर्मिती आणि नव उद्योजक निर्माण होण्यास मदत होईल. आरोग्य, निवास, स्वच्छता, ऊर्जा आणि पाणी यासारख्या भारताच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये नवप्रवर्तन घडवण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे हा अटल इनोव्हेशन मिशनचा एक मुख्य उद्दिष्ट आहे." याचबरोबर तंत्रज्ञानाच्या उत्पादनास सक्षम बनविण्याच्या क्षमता, उद्दीष्ट आणि वचन देणाऱ्या आवेदकांना एक कोटी रुपयांपर्यंतच्या अनुदान देण्यात येणार असल्याचे देखील रमनन यांनी यावेळी स्पष्ट केले.

अटल इनोव्हेशन मिशन अभियानांतील निर्देशित क्षेत्रे - 
१) हवामान-स्मार्ट शेती, २) रस्त्यावरील आणि रेल्वेसाठी कोळसा दृष्टी प्रणाली, ३) उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वेचे अपघात रोखणे, ४) रोलिंग स्टॉकचे भविष्यकालीन देखभाल, ५) पर्यायी इंधन आधारित वाहतूक, ६) स्मार्ट मोबिलिटी, ७) इलेक्ट्रिक मोबिलिटी, ८) सुरक्षित वाहतूक, ९) इन्स्टंट पोर्टेबल वॉटर क्वालिटी टेस्टिंग, १०) स्वस्त विसर्जन / पुनरुपयोगी तंत्रज्ञान, ११) कचरा व्यवस्थापन पुनर्वापर, १२) कचरा रचना साधने, १३) कंपोस्टची गुणवत्ता, १४) विकेंद्रीकृत कंपोस्टींग, १५) कंपोस्टिंगसाठी ब्लेडचे मिश्रण करणे, १६) सार्वजनिक ठिकाणीचा कचरा वेचण्याचे तंत्र निर्माण करण्यासाठी आर्थिक मदत

Web Title: 'Atal Incubation Center' at Lonar Kalbhor