आटपाडी तलावाच्या काठावर नागनाथअण्णांचे स्मारक उभारणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

दुष्काळग्रस्तांचे आधारवड क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे आटपाडी तलावाच्या काठावर लोकसहभागातून स्मारक उभारण्याचा निर्धार पाणी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला. भिंगेवाडी येथे बैठक झाली. 

आटपाडी : दुष्काळग्रस्तांचे आधारवड क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे आटपाडी तलावाच्या काठावर लोकसहभागातून स्मारक उभारण्याचा निर्धार पाणी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला. भिंगेवाडी येथे बैठक झाली. 

भिंगेवाडी (ता.आटपाडी) येथे कृषी विद्यालयात श्रमिक मुक्‍तीदल आणि पाणी संघर्ष चळवळीने क्रांतीवीर नागनातअण्णा नायकवडी यांना स्मृतीदिनी अभिवादन केले. आनंदराव पाटील, ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब पत्की, स्वाभिमानी विकास आघाडीचे भारत पाटील आदी उपस्थित होते. अण्णांच्या स्मृतीला अभिवादन करून लोकसहभागातून पुढील वर्षापर्यंत त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्धार त्यांनी केला. 

पाटील म्हणाले,"दुष्काळी भागाला टेंभूचे पाणी केवळ अण्णांच्या नेतृत्वाखालील लढ्यामुळे मिळाले. त्यामुळेच दुष्काळी भागाचे नंदनवन होऊ लागले आहे. लोकजीवनात बदल घडू लागलाय. अण्णांचे स्मारक उभाण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. जागेचा प्रश्‍न मार्गी लागत आलाय. लवकरच काम सुरू होईल.'' 
विजयसिंह पाटील, मनोहर विभूते, अशोक लवटे, अरविंद चांडवले, विकास विभूते आदी उपस्थित होते. 

Web Title: Atapadi Talav will establish Memorial of Nagnath Anna