एटीएम फोडणारा चोरटा रंगेहात सापडला

आनंद गायकवाड 
रविवार, 12 ऑगस्ट 2018

आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेत असलेले सेन्ट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न तांत्रिक करामतीमुळे फसला. एटीएम मधून दिपक विजय लाड (वय 35, रा. वरवंडी, ता.संगमनेर) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  सेन्ट्रल बँकेचे आश्वी शाखेचे शाखाधिकारी प्रविण कुंभारे (वय 42) यांनी आश्वी पोलिस ठाण्यात या बाबत फिर्याद दिली आहे. आज पहाटे आश्वी बुद्रूक येथील रमेश धर्माधिकारी यांच्या जागेतील तळमजल्यावर रहिवाशी वस्तीत असलेल्या सेंट्रल बँकेच्या एटीएम मध्ये आरोपीने पहाटे 4.30 च्या सुमारास प्रवेश करून, एटीएमचे सेंसर व एटीएम मशीनचा लॉक तोडला.

त्यामुळे तेथील सायरन जोराने वाजू लागला. त्याच वेळी मशिनमध्ये केलेल्या तांत्रिक व्यवस्थेमुळे याची सुचना मुंबईत असलेल्या कंपनीच्या मुख्य कार्यालयाला समजल्याने त्यांनी तातडीने आश्वी पोलिस ठाणे व बँकेच्या शाखाधिकाऱ्यांना एटीएम मध्ये होत असलेल्या छेडखानी बद्दल माहिती दिली. गस्तीच्या वाहनावर असलेले सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय उजे, चालक पी.एन. झोडगे व पोलिस नाईक पी.सी. खाडे यांनी तातडीने त्याला जागेवरच पकडला.

त्याची चौकशी करताना त्याने त्याच्याबरोबर इतर आरोपी असल्याचे सांगितले. परंतु, त्याची सत्यता पडताळण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकाला निराश होऊन परतावे लागले. त्यातील एक नगरच्या सबजेलमध्ये असल्याचे तर दुसरा जेजुरीला गेल्याचे स्पष्ट झाल्याने, आरोपी पोलिसांची दिशाभुल करीत असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी विरुध्द आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिस निरिक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय उजे पुढील तपास करीत आहेत.  

Web Title: The ATM broke out was found in a thief