आटपाडीत हमीभाव भावाने मका खरेदी केंद्रावर नोंदणी सुरू

Atpadi Hamitbhav Bhav starts registration at Maize Shopping Center
Atpadi Hamitbhav Bhav starts registration at Maize Shopping Center

आटपाडी : आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत हमीभाव भावाने मका खरेदी केंद्रावर नोंदणी सुरू झाली आहे. गुरुवार (ता. 3) पासून मका खरेदी केली केली जाणार आहे. बाजार समिती मधील मका खरेदी केंद्र सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत व्यापाऱ्यांनीही दरात वाढ सुरू केली आहे. 

आटपाडी तालुक्‍यात 400 ते 600 हेक्‍टर क्षेत्र दरम्यान मका लागवडीचे क्षेत्र आहे. गेल्या दीड महिन्यापासून शेतकऱ्यांनी मका पिकाची काढणी आणि मळणी करून ठेवली आहे. बाजारपेठेत मक्‍याची आवक सुरू होताच मकेचा हमी भाव प्रतिक्विंटल 850 असताना व्यापाऱ्यांनी मक्‍याचे दर प्रतिक्विंटल बाराशे रुपयांपर्यंत खाली आणले. त्यामुळे शेतकऱ्याकडून मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होत होती. 

या पार्श्वभूमीवर आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने अभिकर्ता संस्थेकडे मका खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मान्यतेची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समितीला मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मान्यता दिली. 15 नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांची नोंदणी सुरू केली आहे. आत्तापर्यंत 40 हेक्‍टर क्षेत्राची नोंद झाली आहे. या केंद्रावर उद्या (ता. 3) पासून प्रत्यक्ष मका खरेदी सुरू केली जाणार आहे. हमीभाव 850 प्रतिक्विंटल असा आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती भाऊसाहेब गायकवाड, सचिव शशिकांत जाधव यांनी केले आहे.

खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी स्वखर्चाने मका घेऊन यायचा आहे. तो उतरवून घेण्यासाठी लागणारी हमाली शेतकऱ्यांनाच द्यावी लागणार आहे. खरेदी केंद्रावर दोन प्रकारच्या चाळणीतून मक्‍याची प्रतवारी करून खरेदी केली जाते. त्यानंतरचा हमाली खर्च हा शासन करते. मक्‍याची नोंद असलेला सात बारा उतारा, आधार कार्ड आणि बॅंक पासबुकची झेरॉक्‍स बाजार समितीकडे जमा करावी. विक्री केल्यापासून आठ - दहा दिवसात शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर शासन त्यांचे पैसे थेट जमा करते. 

व्यापाऱ्यांकडून दरात वाढ 
काही दिवसापासून अनेक व्यापारी बाजार समितीच्या संपर्कात आहेत. ते रोज मका खरेदी केंद्र कधी सुरू होणार याचा आढावा घेतात. त्याचा अंदाज घेऊन त्यांनी दरात वाढ सुरू केली आहे. सध्या बाराशे रुपये पासून 1500 रुपये पर्यंत भाव वाढवलेत. आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. या स्थितीत शेतकऱ्यांना लुटणाऱ्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रावरच शेतमालाची विक्री करावी, असे आवाहन बाजार समितीने केले आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com