आटपाडी : डाळींब शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

आटपाडी - वादळी पावसामुळे टँकरच्या पाण्यावर जोपासलेल्या डाळींबाचे तेलकट आणि करपा रोगाने मोठे नुकसान केले आहे. याचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी दोन लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेने तहसीलदारांना दिले.        

आटपाडी - वादळी पावसामुळे टँकरच्या पाण्यावर जोपासलेल्या डाळींबाचे तेलकट आणि करपा रोगाने मोठे नुकसान केले आहे. याचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी दोन लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेने तहसीलदारांना दिले.        

20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण आटपाडी तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात वादळाचा पाऊस झाला. जुलैमध्ये धरलेल्या डाळिंब बागांच्या फळाची या काळात हिरवी अवस्था होती. अत्यंत नाजूक अवस्थेत पाऊस झाल्यामुळे उष्णतेत प्रचंड वाढ झाली. त्यामुळे तेलकट रोग मोठ्या प्रमाणावर पसरला. ज्या भागात पाणी साचले तेथे करपा रोगाने शिरकाव केला. पहिल्यांदाच ओला करपा आल्यामुळे त्यावर निश्चित औषध नव्हते. सोलापूर संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी भेटी देऊन पाहणी केली. पण त्यांनाही याचे निश्‍चित निदान सापडले नाही. तज्ञांच्या शिफारसीने शेतकऱ्यांनी महागड्या फवारण्या घेतल्या तरीही रोग आटोक्यात आला नाही. या रोगामुळे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने कृषी आणि महसूल विभागाच्या माध्यमातून बागांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बळीराजा संघटनेने केली आहे. 

याबाबतचे निवेदन तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डी. एम. पाटील, बळीराजा संघटनेचे युवा अध्यक्ष अमित गिड्डे, उमेश देशमुख, मोहन खरात आदिने तहसीलदारांना निवेदन दिले.  

Web Title: Atpadi: Payback of pomegranate farmers as early as possible