कृष्णेत मगरीच्या हल्ल्यात ब्रम्हनाळचा युवक ठार झाल्याची चर्चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

तुंग - येथील कृष्णा नदीवर मगरीच्या हल्ल्यात ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथील युवकाचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. जीतसागर (बंडु) दत्तात्रय गडदे (27) असे या युवकाचे नाव असून त्याचा मृतदेह आज आढळून आला आहे

तुंग - येथील कृष्णा नदीवर मगरीच्या हल्ल्यात ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथील युवकाचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. जीतसागर (बंडु) दत्तात्रय गडदे (27) असे या युवकाचे नाव असून त्याचा मृतदेह आज आढळून आला आहे. ग्रामस्थ दोन दिवस जितसागर याचा शोध घेत होते. आज कृष्णा नदीपात्राजवळील डोहाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला.

Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्राला पाणी देण्याचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन खोटे  

उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सांगलीच्या शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आला आहे. त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. मात्र घटनास्थळावरील लोकांनी हा मगरीचाच हल्ला असण्याची शक्यता वर्तवली आहे.  

Deepavali 2019 : अंधशाळेत उजळते डोळस दिवाळी....  

त्याच्या डाव्या पायाला जखमेच्या खुणा व कमरेला खरचटल्याचे दिसत आहे. परंतु वनविभागाकडून मगरीने हल्ला केला आहे असे जाहीर करण्यात आलेले नाही. शवविच्छेदनानंतर कोणत्या प्राण्याचा हल्ला आहे, ते निष्पन्न होईल असे सांगण्यात आले.

Deepavali 2019 : कोल्हापूर बाजारात मॅजिक दिव्यांसह विविध कंदीलही  

दरम्यान जीतसागर हा मंगळवारी (ता. 15) शेताकडे भूमिपूजनासाठी गेला होता. तेव्हापासून तो घरी परतला नव्हता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्याची हरवल्याची रीतसर तक्रार पोलीस स्टेशनला केली होती. जीतसागरला पोहता येत नव्हते. नदीकडे गेल्यानंतर पाय घसरून पडला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शी घटना पाहणारे कोणी नसल्याने याविषयी संदिग्धता निर्माण झाली आहे. या घटनेचा तपास वनविभागचे वनपाल मारुती ढेरे, वनरक्षक शहाजी टवरे व पोलिस करत आहेत.

रत्नागिरी : दापोलीत सुमारे दोन हजार ग्रॅम गांजा जप्त 

जलचर प्राण्याकडून  हल्ला झाल्याच्या खुणा आहेत. परंतु सविस्तर माहिती वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होईल 

-  मारुती ढेरे, परिमंडळ वनअधिकारी पलुस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in an attack of aquatic animal Brahmanal youth killed in Krishna River