नगरमध्ये भटक्या कुत्र्याचा चिमुरड्यावर हल्ला 

नगरमध्ये भटक्या कुत्र्याचा चिमुरड्यावर हल्ला 

नगर - शहरातील कोठला परिसरात असणाऱ्या घास गल्ली येथे कुत्र्याच्या हल्ल्यात तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने पुण्याला हलविण्यात आले आहे. 

दिलखुश प्रजापती (3) असे त्याचे नाव आहे. आज सकाळी त्याची आई आणि आजी या दोघी कामाला गेले असता मुलगा घराजवळच खेळत होता. सुमारे आठ वाजेच्या दरम्यान या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. त्यात त्याच्या डोक्याला, पायाला आणि हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत. ही घटना परिसरातील नागरिकांनी पाहिल्यानंतर त्या चिमुरड्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याची परिस्थिती पाहता जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविले आहे.

मुलाची परिस्थिती गंभीर असून त्याच्या डोक्याला सर्वाधिक जखमा आहेत, अशी माहिती समजली.

मुलाच्या अंगावर सर्वत्र कुत्रे चावल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. त्याच्या डोक्याला सर्वाधिक चावा असून परिस्थिती चिंताजनक आहे, अशी माहिती डॉक्टर प्रियांका पठारे यांनी दिली.

मी आणि सासूबाई धुणी-भांडीची कामे करतो. आज सकाळी कामावर गेल्यानंतर पाठीमागे ही घटना घडली. साहेब मला एकुलता एक मुलगा आहे, अशी प्रतिक्रिया मुलाच्या आईने सकाळची बोलताना व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com