पारनेर तहसीलदारांवर वाळूचोरांचा हल्ला 

Attack on Parner Tahsildar
Attack on Parner Tahsildar

पारनेर : बेकायदा वाळूवाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या पथकावर ढवळपुरी शिवारात वाळूचोरांनी हल्ला केला. तहसीलदारांना धक्काबुक्की करून शासकीय वाहनांवर वाळूचे वाहन घालण्याचा प्रयत्न करून महसूल कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना काल रात्री घडली. या घटनेने पारनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

तहसीलदार ज्योती रामदास देवरे यांच्या फिर्यादीवरून अक्षय पाडळे, आकाश रोहकले व बापू सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 
अधिक माहिती अशी ः ढवळपुरी शिवारात विनापरवाना वाळूचोरी व वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांना मिळाली. त्यानुसार बुधवारी (ता. 25) रात्री पारनेरच्या तहसीलदार देवरे पथकासह ढवळपुरी शिवारात गेल्या तेव्हा आरोपी अक्षय पाडळे, आकाश रोहकले व बापू सोनवणे शासकीय वाळूची चोरी करून डंपरमध्ये बेकायदा वाहतूक करताना आढळून आले.

वाळूचा डंपर घालण्याचा प्रयत्न

तहसीलदार देवरे यांनी वाळूवाहतूक करणाऱ्या वाहनांचा पाठलाग सुरू केला. वाळूचोरांनी शासकीय वाहनांवर वाळूचा डंपर घालण्याचा प्रयत्न केला. तहसीलदारांसह पथकाला धक्काबुक्की करून वाळूचोरांनी पळ काढला. तहसीलदार ज्योती देवरे यांच्या फिर्यादीवरून, शासकीय कामात अडथळा आणून पथकातील लोकांना धक्काबुक्की केल्याचा गुन्हा पारनेर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 
 
तहसीलदारांवर दुसऱ्यांदा हल्ला 
दरम्यान, यापूर्वी वाळूचोरांनी जेसीबी अंगावर घालून तहसीलदारांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. जिल्ह्यातील कोपरगाव, श्रीगोंदे, राहुरी, नेवासे येथे महसूल पथकावर वाळूचोरांनी हल्ला केल्याच्याही घटना घडल्या आहेत. 


वाळूचोर कारागृहात स्थानबद्ध 
जिल्ह्यात वाळूचोरीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत असून, वाळूचोर थेट महसूल पथकावर हल्ला करीत आहेत. या वाळूचोरांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी वाळूचोरीचे चारपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींची "एमपीडीए'अंतर्गत एका वर्षासाठी कारागृहामध्ये रवानगी केली आहे. पारनेर तालुक्‍यातील दोन वाळूचोरांवर याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 


 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com