शिवसेना नेत्यांच्या मुलांवर पूर्ववैमानस्यातून हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

सोलापूर : शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे यांचा मुलगा समर्थप्रसाद बरडे (वय 20, रा. गुलमोहर आपार्टमेंट, अवंती नगर, जुना पुना नाका, सोलापूर) आणि शिवसेना शहरप्रमुख हरीभाऊ चौगुले यांचा मुलगा धवल चौगुले या दोघांवर हल्ला केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास गांधीनगर येथील रोल्स मेनिया हॉटेल समोर घडली. 

मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास समर्थप्रसाद बरडे हा त्याच्या मित्रांसोबत गांधी नगर परिसरातील हॉटेलमध्ये आला होता. हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर रोहित शंकर जाधव (वय 26, रा. सेटलमेंट कॉलनी, सोलापूर) व त्याच्या पाच साथीदारांनी पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून समर्थप्रसाद याच्यावर हल्ला केला. समर्थप्रसादने वार चुकविला. तो वार कारला लागला. कारची काच फुटून नुकसान झाले. त्यानंतर समर्थप्रसाद हा तेथून पळाला.

तिथे असलेल्या धवल चौगुले आणि आशुतोष नरोटे या दोघांना रोहित आणि त्याच्या साथीदारांनी लोखंडी सळई, हॉकीस्टीकने मारहाण केली. काही वेळानंतर समर्थप्रसाद यास फोन करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सदर बझार पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: attack on son of shivsena leader in solapur