फेसबुकवर पत्नीला फ्रेंड रिक्‍वेस्ट पाठविल्याच्या संशयावरून तरुणावर जीवघेणा हल्ला

फेसबुकवर पत्नीला फ्रेंड रिक्‍वेस्ट पाठविल्याच्या संशयावरून तरुणावर जीवघेणा हल्ला

कोल्हापूर - फेसबुकवर पत्नीला फ्रेंड रिक्‍वेस्ट पाठविल्याच्या संशयावरून एका तरुणाला मध्यरात्री चौघांनी जबरदस्तीने मोटारीत घालून शिवाजी पार्क व पिकनिक पॉइंट येथे नेले. तेथे हॉकी िस्टक व दांडक्‍याने केलेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्यातच त्याला हृदयविकाराचा धक्काही बसला. सिद्धार्थ संतोष परमार (वय २६, रा. गुजरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याला कदमवाडीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला. तो माजी नगरसेवक रणजित परमार व माजी नगरसेविका नयना परमार यांचा जनक मुलगा आहे. 

टिल्लू ऊर्फ दिग्विजय शिवाजीराव पोवार (रा. ताराबाई पार्क), टिल्लूचा दाजी मंदार (पूर्ण नाव पत्ता समजू शकलेले नाही) आणि त्याचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, सिद्धार्थ हे रणजित परमार व नयना परमार यांचा मुलगा आहे. परमार यांनी सिद्धार्थला भाऊ संतोष यांना दत्तक दिले आहे. सिध्दार्थ केमिकल इंजिनिअर असून, पुण्यात पुढील शिक्षण घेत आहेत. काही दिवसांपूर्वी ते कोल्हापुरात आले होते. त्यांनी संशयित टिल्लूकडून काही पैसे घेतले होते. त्याचा व्यवहारही पूर्ण केला होता. यातून सिद्धार्थची टिल्लूच्या पत्नीशी ओळख झाली होती. सिद्धार्थ यांनी पत्नीला फेसबुकवर फ्रेंड रिक्‍वेस्ट पाठवल्याचा संशय होता. काल रात्री सिद्धार्थ हे दोन मित्रांसोबत ताराराणी चौक परिसरातील एका हॉटेलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी व जेवण करण्यासाठी गेले होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास ते मित्रांसोबत हॉटेलमधून बाहेर पडले.

संशयित टिल्लूने सिद्धार्थ व त्याच्या मित्रांना अडवले. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचा दाजी मंदार व अन्य दोन साथीदार होते. त्या चौघांनी सिद्धार्थला शिवाजी पार्क परिसरात नेले. त्याला हॉकी स्टीक व लाकडी दांडक्‍याने बेदम मारहाण केली. हा प्रकार सुरू असताना सिद्धार्थचे दोघे मित्र तेथून निसटले. त्यानंतर त्या चौघांनी एका पांढऱ्या मोटारीत जबरदस्तीने घालून पंचगंगा नदीजवळील पिकनिक पॉईंट येथे नेले. तेथेही सिद्धार्थला त्यांनी बेदम मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. 

जखमी अवस्थेत सिद्धार्थ हे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. तेथून ते पुन्हा कदमवाडी परिसरातील रुग्णालयात पुढील उपचारासाठी गेले. दरम्यान, त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती फोनवरून नातेवाइकांना दिली. तसे नातेवाईक त्या रुग्णालयात दाखल झाले, मात्र सिद्धार्थ यांना यावेळी हृदयविकाराचा धक्का बसला. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असून, उपचार सुरू आहेत.

दरम्यान, आज दुपारी शाहूपुरी पोलिसांनी खासगी रुग्णालयात जाऊन जखमी सिद्धार्थची भेट घेतली, मात्र तो संशयित टिल्लूच्या दहशतीमुळे सुरवातीला फिर्याद देण्यास घाबरत होता; मात्र त्याला धीर दिल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली. त्यानुसार संशयित टिल्लू ऊर्फ दिग्विजय पोवार, त्याचा दाजी मंदारसह दोघा साथीदारांवर जीवघेणा हल्ला, अपहरण अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल झाले. त्यानुसार पोलिसांनी चारही संशयितांचा शोध सुरू केला. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शहाजी निकम करीत आहेत. 

टिल्ल्याचे रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू
संशयित टिल्ल्यावर यापूर्वी सीपीआर कैदी वॉर्डात कैद्यासोबत पार्टी केल्याबाबत गुन्हा दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याची शहानिशा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com