शिरवळ येथील पत्रकार मुराद पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

खंडाळा (सातारा) - शिरवळ येथील पत्रकार मुराद पटेल यांच्यावर रात्री अज्ञात मारेकऱ्यांनी जीवघेणा हल्ला केला. यामध्ये मुराद पटेल गंभीर जखमी झाले असुन, या घटनेची शिरवळ पोलिस स्टेशनला नोंद झाली आहे. यामध्ये अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सहा हल्लेखोर दोन दुचाकीवरुन आले. मुराद पटेल यांच्या दुचाकीला गाडी आडवी करुन थांबण्याचा प्रयत्न केला. यातील चार हल्लेखोरांनी गाडीवरुन उतरुन त्यांच्यावर वार केले. तर दोघेजण गाडीवरच थांबले. यावेळी हातावर व पाठीवर सतुराने वार केला. तसेच इतरत्रही वार करण्यात आले. यानंतर हल्लेखारांनी पोबारा केला. यामध्ये मुराद पटेल हे गंभीर जखमी झाले. यानंतर यांना तत्काळ शिरवळ येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. व्ही. अरगडे करीत आहे.

रात्री पत्रकार वर धारधार शस्ञाने झालेला हल्ला हा भयावय आहे. यामुळे शिरवळ परिसर सध्या गुंडागर्दीच्या भितीच्या छायेखाली असल्याने, येथील घडत असलेल्या गुंडागर्दीला वेळीच आवर घालणे गरजेचे असल्याचे अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गेल्या आठवड्यापुर्वीच केसुर्डी येथे बांधकाम व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. 

Web Title: attacked on journalist Murad Patel in Shirwal