बापरे.. 'यामुळे' त्याने कापून घेतले गुप्तांग! 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

- कामावरून काढण्याची मिळाली आहे नोटीस 
- मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न 
- शासकीय रुग्णालयात केले उपचार 
- ऑफीसर क्‍लबमध्ये आहे कामाला

सोलापूर : कामावरून काढण्याची नोटीस मिळाल्याने मानसिक तणावातून गुप्तांग कापून घेतल्याची घटना घडली. ही घटना गेल्या आठवड्यात घडली असून उपचारानंतर जखमी व्यक्तीला घरी सोडण्यात आले आहे. आत्महत्येचा प्रयत्न केलेली व्यक्ती गांधीनगर परिसरातील ऑफिसर क्‍लबमध्ये गेल्या 20 वर्षांपासून कामाला असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : भांडणाचे विचारले कारण अन.. छतीवर झाडली गोळी

पाचजणांना दिली आहे नोटीस 
दिनेश रामदास क्षीरसागर (वय 45, रा. आदर्शनगर, जुना कुंभारी नाका, सोलापूर) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. क्षीरसागर हे गेल्या 20 वर्षांपासून ऑफिसर क्‍लबमध्ये कर्मचारी आहेत. त्यांच्यासह इतर चार ते पाच जण कर्मचाऱ्यांना ऑफिसर क्‍लब प्रशासनाने कामावरून काढण्याची नोटीस बजाविली आहे. क्षीरसागर यांना दोन मुले असून त्यांची पत्नी विडी वळण्याचे काम करते. कामावरून काढण्याची नोटीस मिळाल्याने क्षीरसागर हे तणावाखाली होते. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास क्षीरसागर यांनी राहत्या घरी ब्लेडने गुप्तांग कापून घेतले. त्यानंतर घाबरलेल्या पत्नी मंजुळा क्षीरसागर यांनी पती दिनेश यांना तत्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

हेही वाचा : प्रेम करून लग्न केलय...आंतरजातीय असलो म्हणून जीव घेणार का?

गुप्तांगावर घातले टाके 
जखमी क्षीरसागर यांच्या गुप्तांगावर टाके घालून उपचार करण्यात आले आहेत. या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलिस चौकीत झाली आहे. दरम्यान, या घटनेबाबत ऑफिसर क्‍लबच्या पदाधिकाऱ्यांशी "सकाळ'ने संपर्क साधला असता माहिती घेऊन सांगण्यात येईल, असे सांगितले. कामावरून काढण्याची माझ्यासह पाच जणांना नोटीस दिली आहे. या कारणामुळे मी तणावाखाली आहे. याच कारणातून मी गुप्तांग कापून घेतले आहे, असे दिनेश क्षीरसागर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempts to commit suicide from stress