सहाय्यक निबंधकाच्या दालनात विष घेण्याचा प्रयत्न

सुनील गर्जे 
बुधवार, 20 जून 2018

नेवासे : कर्जाच्या प्रकाराणातून फसवणूक झाल्याने कुकाणे येथे पतसंस्थेत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. या घटनेला चार दिवस होत नाही तोच मंगळवारी नेवासे येथील सहाय्यक निबंधकांच्या दालनातच एका ठेवीदाराने खिशातून विषाची बाटली हातात घेतली मात्र, पिण्या आगोदरच इतर ठेवीदारांनी बाटली हिसकावल्यामुळे मोठा अनर्थ टाळला. याप्रकरणी सहाय्यक निबंधकांनी नेवासे तहसीलदार व पोलीसांत संबंधितांवर कारवाईसाठी तक्रार केली आहे.

याबाबत माहिती अशी, सोनई येथील श्री व्यकेटश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या 2 कोटी रु घोटाळाप्रकरणी लेखा परिक्षक एस. एस. सोमाणी यांनी केलेल्या चौकशीअंती तीन कर्मचारी दोषी आढळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, या पतसंस्थेच्या काही ठेवीदारांनी मंगळवार (ता. १९) रोजी नेवासे येथील सहाय्यक निबंधक दीपक नागरगोजे यांच्या दालनात जावून ठिय्या करत संचालक मंडळावरही गुन्हे का दाखल केले नाही असा जाब विचारला. 

दरम्यान नागरगोजे व ठेवीदार यांच्यात शाब्दिक चकमक चालू असतांनाच पतसंस्थेचे ठेवीदार बाळासाहेब दादा धाडगे (वय ४९) यांनी खिशातून विषारी औषधची बाटली काढून पिणार तोच सहकारी ठेवीदार विष्णु वीरकर यांनी यांच्या हातातून बाटली हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. यादरम्यान दालनात एकाच गोंधळ उडाला होता.
 दरम्यान दोषी संचालक मंडळावर कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी करत, कारवाई न झाल्यास मंगळवार (ता.10) जुलै रोजी याच ठिकाणी सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. 

"संबंधित श्री व्यकेटश पतसंस्थेच्या संचालकांची फेर चौकशी करण्यासाठी आदेश दिलेलेच आहे. मात्र, हा तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे असल्याने संस्थेचे दप्तर त्यांच्याकडेच आहे. एका ठेवीदाराने विषारी द्रव्याची बाटली काढल्याबद्दल आपण तहसीलदार व पोलिसांकडे कारवाईसाठी तक्रार केली आहे." 

-दीपक नागरगोजे, सहाय्यक निबंधक, नेवासे 
 
Web Title: Attempts to get poison in the window of Assistant Registrar