गोदामातील हमाल कामावर हजर; रेशन लवकरच येणार 

1Corona_Danger_19.jpg
1Corona_Danger_19.jpg

सांगली ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना म्हणून आणखी काही काळ देशात लॉक डाऊन असणार आहे. सर्व कामे ठप्प असल्याने आणि घरातून बाहेर पडता येत नसल्याने अनेक गोरगरीब लोकांचे अन्नधान्याचे हाल होणार आहेत.

त्यांना घरपोच रेशन देण्याची जबाबदारी सरकारने उचलली आहे. या प्रक्रियेत महत्त्वाचा घटक असलेल्या हमालांचा अडचणीचा विषय आज जिल्हा प्रशासनाने सोडवला गेला. धान्याच्या गोदामात कामावर जाणाऱ्या हमालांना पोलिसांनी अजिबात मारहाण करू नये. त्यांना त्रास देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्यानंतर हमाल कामावर रुजू झाले.

देशातील लॉक डाऊनचा परिणाम म्हणून सर्वसामान्य आणि गोरगरीब लोकांच्या अन्नधान्याची व्यवस्था सरकारने केली आहे. जिल्ह्यात धान्यही दाखल झाले आहे, मात्र त्याची वितरण व्यवस्था करताना हमालांची जबाबदारी मोठी असणार आहे. हमाल मंडळी कामही करायला तयार आहेत, मात्र रस्त्यावर उतरल्या नंतर त्यांना पोलिसांकडून मारहाण होईल अशी भीती आहे. असे अनेक प्रकार गेल्या दोन-तीन दिवसात घडल्यामुळे त्यांच्यामध्ये धास्ती आहे. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आज जिल्हा प्रशासनाने हमाल नेत्यांसोबत बैठक घेतली. 

त्याची माहिती विकास मगदूम यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. ते म्हणाले, ""आता हमाल कामावर जाऊ शकतात. त्यांना पोलिसांनी मारहाण करायची नाही असे ठरले आहे. त्यामुळे धान्य वितरणाची व्यवस्था आता सुरळीतपणे सुरू होईल. आणि गोरगरीब लोकांची अडचण दूर होईल.'' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com