एटीएम आभावी ग्राहकांचे हाल

Attendees of ATM wanting customers
Attendees of ATM wanting customers

पांगरी (ता.बार्शी) : येथे एटीएमच्या माध्यमातून ग्राहकांना (एनी टाईम मणी) मिळणारे पैसे, मिळू शकत नसल्याने ग्राहकांची अडचण झाली आहे. सतत पैशाअभावीसह अन्य कारणाने बंद राहत असलेले एटीएम सेवा असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. पैसेअभावी बंद राहत असलेल्या एटीएममुळे बॅकामधील गर्दीत वाढत होत असते. बँकेस मोठ्याप्रमाणात ग्राहक असताना देखील एक खिडकीव्दारे पैशाची देवघेव केली जाते. त्यात अनेक वेळा यंत्रणा ठप्प होत असल्याने ग्राहकांना तास-तासभर नाहक वेळ घालवावा लागतो संबंधितांनी याकडे लक्ष देऊन एटीएमची सुविधा सुरळीत करून एटीएममध्ये स्वच्छता राखावी. त्याचबरोबर बँकेत पैसे देवघेव करिता वेगवेगळ्या खिडक्यांद्वारे सोय करावी अशी मागणी खातेदार ग्राहकांमधून होत आहे.

पुणे-लातूर राज्यामार्ग व नव्याने होत असलेल्या सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 सी या रस्त्यावर पांगरी हे निमशहरी ठिकाण असून येथील लोकसंख्या जवळपास 10 हजारपर्यत आहे. त्याचबरोबर आसपासची पंधरा-सोळा गावातील लोकांची बाजारपेठेसाठी सतत रहदारी चालू असते. एक राष्ट्रीयकृत बँकेबरोबर जिल्हा बॅक आहे. अनेक शासकिय कार्यालये, ग्रामीण रूग्णालय, पोलीस ठाणे, रेल्वे स्टेशन आदी महत्वाची कार्यालये आहेत. तालुक्याचे ठिकाणी 20 किमी अंतरावर असल्याने आसपासच्या गावासाठी येथील बाजरपेठ सोयीस्कर ठरत असल्याने सतत लोकांची वर्दळ चालू असते.

याठिकाणीची दोन एटीएमच्या माध्यमातून सेवा दिली जाते. मात्र, ती कुचकामी ठरत आहे. त्यामुळे ग्राहकांचे हाल होत आहेत. अनेक वेळा एटीएम पैशाअभावी व अन्यकारणांनी बंद असतात. यामुळे ग्राहकांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. बँकांनी एटीएम कार्ड जवळपास सर्रास ग्राहकांना दिले. परंतु, ग्राहकांना एटीएम मधून मिळ्णाऱ्या पैशावर भरवसा राहिलेला नाही. ग्राहक एखादा व्यवहार पुर्ण करण्यासाठी एटीएम मध्ये जाऊन पैसे काढण्यासाठी गेला असता पैसे मिळत नाहीत. त्यामुळे नाहक व्यवहारामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. त्याचबरोबर संबंधितांनी एटीएमची व्यवस्था पाहणे गरजेचे असताना देखील दुर्लक्ष केले जात आहे. 

बॅक ऑफ इंडिया पांगरी शाखा अंतर्गत पंधरा गावे येत आहेत. बँकेचे जवळपास 27 हजार खातेदार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्राहकांची वर्दळ असताना देखील एका खिडकीद्वारे पैशाची देवघेव होत असल्याने महिला, विद्यार्थी खातेदारसह अन्य खातेदारांना त्रास सहन करावा लागत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com