सडावाघापुर धबधबा ठरतोय पर्यटकांसाठी आकर्षण

यशवंतदत्त बेंद्रे
सोमवार, 9 जुलै 2018

तारळे (पाटण, सातारा) -  सडावाघापुर ता. पाटण येथील उलटा धबधबा (रिव्हर्स पॉईंट) वर पर्यटकांचे आगमन होऊ लागले आहे. संपूर्ण राज्यभरातून तरुणाई इकडे धाव घेत आहे. जिल्हयातील पर्यटकांबरोबरच पुण्या मुंबई अनेक पर्यटक येथे येत असुन, येथील निसर्गाचा अविश्कार पाहुन मंत्रमुग्ध होत आहेत. 

तारळे (पाटण, सातारा) -  सडावाघापुर ता. पाटण येथील उलटा धबधबा (रिव्हर्स पॉईंट) वर पर्यटकांचे आगमन होऊ लागले आहे. संपूर्ण राज्यभरातून तरुणाई इकडे धाव घेत आहे. जिल्हयातील पर्यटकांबरोबरच पुण्या मुंबई अनेक पर्यटक येथे येत असुन, येथील निसर्गाचा अविश्कार पाहुन मंत्रमुग्ध होत आहेत. 

दिवसेंदिवस या धबधब्याची प्रसिध्दी वाढत आहे. येथुन तारळे पाटण रोडवर सुमारे 14 किमीवर असणाऱ्या सडावाघापुरला उलटा धबधबा (रिव्हर्स पॉईंट) आहे. दरवर्षी पाउसाला सुरुवात झाली की पर्यटकांना या उलटया धबधब्याचे वेध लागतात. जुलै व ऑगस्ट हे दोन महिने सडावाघापुर पठारावर स्वर्ग अवतरल्याचा भास निर्माण करणारे ठरत आहेत. त्यामुळे पठारावर दरवर्षी पर्यटकांची गर्दी वाढु लागली आहे. सुट्टीच्या दिवशी शेकडो गाड्या व हजारो पर्यटक याठिकाणी हजेरी लावतात आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात. 

पाटण रोडवर असणारे सडावाघापुर हे छोटेसे गाव. पावसाळ्यात या गावाचे नैसर्गिक रुपडे पुर्ण पालटते. पाचगणीच्या धर्तीवरील विस्तीर्ण पठार, धुक्यात हरवलेल्या गगनचुंबी पवनचक्क्या, दाट धुके, धुक्यात हरवलेला रस्ता व कौलारु घरे, थंडगार हवा, सोबत पावसाचा शिडकावा, पठारावरुन दिसणारे निसर्गाचे नयनरम्य दृश्य, गढुळ पाण्याने भरुन वाहणारी कोयनामाई, हिरवाईने नटलेले डोंगर, खोल दरी, डोंगराच्या कडे कपारीतुन फेसाळत येणारे लहान मोठे धबधबे, कैकवेळा पठारावर ढगच उतारल्याचा आभास निर्माण करणारे चित्र असे प्रसन्न करणारे वातावरण प्रत्येकाला आवडले नाही तरच नवल. गेल्या काही वर्षांपासुन याच ठिकाणी असणारा उलटा धबधबा पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरत आला आहे. 

पठारावर कडयाशेजारी विस्तीर्ण तळे आहे. हे तळे भऱले की पाणी कडयाकडे वाहु लागते, तसेच पावसामुळे पठारावर पडणारे पाणी कडयावरुन शेकडो मीटर खोल दरीकडे धाव घेते. परंतु वाऱ्याच्या प्रचंड दाबामुळे यातील निम्मयाहुन अधिक पाणी उलटे पठारावरच फेकले जाते. कडयानरुन खाली पडणारे पाणी वाऱ्याच्या प्रचंड दाबामुळे सुमारे शंभर फुटापर्यंत उलटे पठारावर फेकले जाते. दरीला जवळ करणारे धबधबे पाहण्यापेक्षा हा उलटा धबधबा पाहण्यास अनेकजण पसंती देतात. कोयना धरण नवजा धबधबा बघायाला येणारे पर्यटक आवर्जुन येथे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी गर्दी करत आहेत. 

येथील उलटया धबधब्याचा अविष्कार हा संपुर्णतः वाऱ्याच्या दाबावर अवलंबुन आहे. वाऱ्याचा दाब असल्यास अतिशय मनमोहक व डोळयाचे पारणे फेडणारे असा नजारा दृष्टीस पडतो, मात्र अनेकदा वाऱ्याअभावी पाणी उलटे फेकले जात नाही. अशावेळी प्रथमच आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होण्याची शक्यता असते. अनेकदा पर्यटक अशी नाराजी बोलुन दाखवत असतात. मात्र धुके, थंडगार वारा, हिरवाईने नटलेला परिसर छोटेमोठे धबधबे याचा मनसोक्त आनंद ते घेउ शकतात. असे असले तरी येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वर्षानुवर्षे वाढ होत आहे.

Web Title: Attractions for the tourists due to the Sadavavapur waterfalls