ऑगस्ट क्रांती स्तंभाभोवती स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

सातारा - चले जाव आंदोलन स्मारकाच्या नियोजित जागेवर उभारलेल्या ऑगस्ट क्रांती स्तंभाच्या भोवतालची आज जकातवाडी येथील यशवंतराव चव्हाण सामाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नेहरू युवा मंडळ धावडशीचे पदाधिकारी यांनी स्वच्छता केली. ‘सकाळ’ने या स्मारकाला निधी उपलब्ध होत नसल्याबाबत, तसेच स्तंभ परिसरात झालेल्या दुरवस्थेबाबतचे वृत्त आज (बुधवारी) प्रसिद्ध केले होते. 

चले जाव स्मारकाला निधी उपलब्ध होत नसल्याने या स्मारकासाठी नियोजित केलेल्या अडीच एकर जागेला बकाल रूप आले आहे. या जागेत उभारण्यात आलेल्या ऑगस्ट क्रांती स्तंभाशेजारील जागेत मोठ्या प्रमाणात गवत वाढले होते. याबाबत ‘सकाळ’ने आज ‘चले जाव स्मारक अडकले निधीच्या गर्तेत’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जकातवाडी येथील समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी, तसेच धावडशी येथील नेहरू युवा मंडळाचे पदाधिकारी आणि स्मारक समिती सदस्यांनी या स्तंभाशेजारील जागेची आज सकाळी स्वच्छता केली.

सुरवातीला विद्यार्थ्यांनी शोषणमुक्ती व मानवता प्रस्थापित करण्यासाठी अविरत संघर्ष करण्याचा संकल्प करून शपथ घेतली. त्यानंतर सुमारे दोन तास या स्तंभाच्या भोवतालची स्वच्छता केली. या श्रम सहभागानंतर स्मारक समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना खारीक आणि केळी हा अल्पोपहार देण्यात आली. या वेळी प्रा. प्रेरणा जगदाळे, भानुदास यादव, संतोष पवार, उमेश चोरगे, मनोज पवार, शिरीष कापसे, वीरेंद्र जाधव, डॉ. गिरीश पेंढारकर, स्मारक समितीचे शंकर पाटील, शिवाजी राऊत, अस्लम तडसरकर, नरेंद्र रोकडे, उत्तम दणाणे आदी उपस्थित होते.

‘सकाळ’ला धन्यवाद
दरम्यान, ‘चले जाव स्मारका’बाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून तेथील समस्यांबाबत आवाज उठविल्याबद्दल स्मारक समितीच्या सदस्यांनी ‘सकाळ’ला धन्यवाद दिले.

Web Title: August Kranti Stoop Cleaning