रिक्षा असोसिएशच्या ऍटो कॉलनीसह विविध मागण्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

निपाणी : केंद्र सरकारने विश्‍वासात न घेता अन्यायकारक वाहनशुल्क रिक्षा व्यावसायिकांना पाठविले आहे. मुळातच हा व्यवसाय सध्या कोलमडला असून उदरनिर्वाह कठीण झाला आहे. वाहनाच्या विम्यामध्येही भरमसाट वाढ झाली आहे. त्याशिवाय प्रादेशिक वाहतूक खात्यातर्फे वेळोवेळी दंडही आकारला जात आहे. तो कमी करण्यासह व्यावसायिकांसाठी शहरात ऍटो कॉलनी, समुदाय भवन व दारिद्य्ररेषेखालील शिधापत्रिका देण्याच्या मागणीचे निवेदन मध्यवर्ती रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे खासदार प्रकाश हुक्केरी यांना रविवारी (ता. 29) देण्यात आले. 

खासदार प्रकाश हुक्केरी यांनी निवेदन स्वीकारून असोसिएशनच्या मागण्या योग्य असून वाढीव शुल्क कमी करण्यासाठी नेते मंडळीसह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. या व्यावसायिकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगितले. यापूर्वी लक्ष्मण चिंगळे व माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री सिद्धरायमय्या यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शहरात ऍटो कॉलनी, समुदाय भवन व शिधापत्रिका मंजुरीचे पत्र पाठविले आहे. त्याचा लवकरच लाभ व्यावसायिकांना व्हावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. 

संघटनेचे अध्यक्ष प्रसाद जाधव, महमद मुजावर, शाम टिकारे, दिलीप कट्टी, प्रवीण उतळेकर, अजित सटाले, संजय शास्त्री, गजानन खापे, चेतन रजपूत, दीपक जोतावळे, प्रकाश घोडके, प्रवीण झळके, महेश माकने, रमेश वाघळे, विजय कांबळे, अमित वाझरे, गणेश झेंडे, चंदू पाटील उपस्थित होते. 
 
Web Title: Auto rickshaw strike in kolhapur