खरिपासाठी पुरेशा प्रमाणात खताची उपलब्धता 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

सोलापूर - जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी रासायनिक खतांचा मागणीप्रमाणे पुरवठा झाला आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात रासायनिक खत उपलब्ध आहे. जिल्ह्यात कोणत्याच प्रकारच्या खताची टंचाई नसल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी. एस. बेंदगुडे यांनी "सकाळ'ला दिली. 

खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरवात झाली आहे. पेरणीसाठी वेगवेगळ्या खतांची शेतकऱ्यांना आवश्‍यकता असते. ज्या खतांची आवश्‍यकता आहे, ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचेही श्री. बेंदगुडे यांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वी अक्कलकोट तालुक्‍यात डीएपी खत मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. मात्र, आता त्या खताचाही पुरवठा पुरेशा प्रमाणात झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. खरीप हंगामासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने 76 हजार 540 मेट्रिक टन खताचे नियोजन केले आहे. त्याबदल्यात जिल्ह्यासाठी 77 हजार 145 मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला असल्याचेही श्री. बेंदगुडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना ज्या खताची आवश्‍यकता आहे त्या खताचे ते खरेदी करू शकतात. 

युरियाचे नियोजन - 31 हजार 250 मेट्रिक टन 
पुरवठा झालेला युरिया - 32 हजार 98 मेट्रिक टन 
"डीएपी'चे नियोजन - 10 हजार 450 
पुरवठा झालेला डीएपी - पाच हजार 962 मेट्रिक टन 
-संयुक्त खताचे नियोजन - 17 हजार 570 मेट्रिक टन 
पुरवठा झालेले संयुक्त खत - 22 हजार 655 मेट्रिक टन 
"एमओपी'चे नियोजन - सात हजार 460 मेट्रिक टन 
पुरवठा झालेले खत - सहा हजार 795 
एसएसपी खताचे नियोजन - नऊ हजार 810 
पुरवठा झालेले खत - नऊ हजार 635 

शेतकऱ्यांनी युरिया या खताचा योग्य प्रमाणात वापर करावा. जमिनीचा पोत खराब होणार नाही, याचीही काळजी घ्यावी. जैविक खताच्या वापरावर भर द्यायला हवा. 
एस. पी. बेंदगुडे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद. 

Web Title: Availability of sufficient quantity of fertilizers