अविनाश मोहिते यांचा जामीन अर्ज फेटाळला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

कऱ्हाड - तोडणी वाहतूकदारांच्या बनावट कर्जप्रकरणी शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील यांचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सी. पी. गड्डम यांनी आज फेटाळला. 

तालुकास्तरीय फौजदारी न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर श्री. मोहिते यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सरकार व बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला. त्याचा आज निकाल होता. श्री. मोहिते, श्री. पाटील हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दोघांतर्फे ऍड. मोहन यादव यांनी म्हणणे मांडले. श्री. मोहिते, श्री. पाटील यांच्या 2014- 15 च्या काळात गळीत हंगामासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या 784 वाहनधारकांना न घेतलेल्या कर्जापोटी प्रत्येकी सात लाख रुपये अशा एकूण 58 कोटी दोन लाखांच्या परतफेडीच्या नोटिसा बॅंक ऑफ इंडियाकडून पाठविण्यात आल्या होत्या. त्यापैकी यशवंत पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा) यांनाही नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानुसार श्री. मोहिते, श्री. पाटील यांना अटक झाली होती. सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. श्री. मोहिते, श्री. पाटील यांच्याकडून जामिनासाठी उच्च न्यालायात अर्ज दाखल करण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Avinash Mohite rejected the bail application of