बायोग्रीन टॅंकमुळे दुर्गंधीपासून मुक्तता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

महाबळेश्वर - श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायत कार्यालय आणि अंगणवाडीच्या शौचालयात पर्यावरणपूरक बायोग्रीन रेडिमेड सेप्टिक टॅंकच्या वापरामुळे दुर्गंधीपासून मुक्तता मिळणार आहे.

महाबळेश्वर - श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायत कार्यालय आणि अंगणवाडीच्या शौचालयात पर्यावरणपूरक बायोग्रीन रेडिमेड सेप्टिक टॅंकच्या वापरामुळे दुर्गंधीपासून मुक्तता मिळणार आहे.

शौचालयाच्या सेप्टिक टॅंकच्या जागेवर बसवण्यात आलेल्या बायोडायजेस्टर टॅंकमध्ये एकदा बॅक्‍टेरिया सोडला जातो. हा बॅक्‍टेरिया मानवाची विष्ठा पूर्ण खाऊन त्यातील पाणी, मलमूत्र या टाकीत शुद्ध करतात. पुढे हे शुद्ध पाणी आपण शेती, बागेसाठी १०० टक्के पुनर्वापरात आणू शकतो. हे बॅक्‍टेरिया टाकी बसविताना एकदा सोडल्यानंतर पुढील किमान ५० वर्षे काहीच करावे लागत नसल्याने, तसेच शुद्ध पाण्याचा वापर शेती व बागेसाठी वापरात येत असल्याने ही यंत्रणा अद्ययावत आणि पर्यावरणपूरक अस्वच्छतेचा प्रश्‍न येत नाही.  कॉलेरा, टॉयफाईड, मलेरिया, डेंगी यासारख्या आजारांपासून मुक्तता मिळणार आहे.

पुण्याच्या के. के. नाग प्रायव्हेट लिमिटेड व डी. आर. डी. ओ. ग्वाल्हेर यांच्या संयुक्त संशोधनातून या यंत्रणेचा वापर गावागावांतून होत आहे. 
७०० लिटर क्षमतेपासून १५ हजार लिटर क्षमतेपर्यंतची यंत्रणा म्हणजेच घरातील चार ते आठ लोकांपासून ८०० लोकांपर्यंत हे टॅंक विकसित करता येऊ शकतात. बायोडायजेस्टर टॅंकमुळे परंपरागत शोषखड्डे व सेप्टिक टॅंक बांधायची गरज नाही. परंपरागत सेप्टिक टॅंक बांधायचा जेवढा खर्च येतो त्याहून कमी खर्च या बायोडायजेस्टर टॅंक यंत्रणेला येतो. 

जागेची देखील बचत होते, तसेच किमान ५० वर्षे अखंडपणे ही यंत्रणा सेवा देत असताना मैल्याचे सतत विघटन होत असल्याने टाकी मैल्याने कधीच भरत नाही. त्यामुळे तिचा उपसा करण्याची गरज कधी भासत नाही. यामधून बाहेर येणारे पाणी हे १०० टक्के शुद्ध असल्याने ते शेतीसाठी व बागेसाठी वापरात येऊ शकते, तसेच ते पाणी उघड्यावरून वाहिले तरी कोणताही वास, रंग नसल्याने त्याची रोगराई पसरण्याची देखील कोणतीच भीती नाही. 

Web Title: Avoid bad odors due to biogenetic tank