esakal | कोरोनाचे संकट टळू दे, पहिल्यासारखे वातावरण निर्मळ होऊ दे
sakal

बोलून बातमी शोधा

Avoid the Corona crisis, let the atmosphere be as clean as before

कोरोनाचे संकट टळू दे. पहिल्यासारखे वातावरण निर्मळ होऊ दे, असे मागणे बेघरांनी गणरायाकडे घातले. येथील सावली बेघर निवारा केंद्रात बाप्पांचे जल्लोषी स्वागत करीत पर्यावरपूरक गणेशोत्सव सुरू आहे.

कोरोनाचे संकट टळू दे, पहिल्यासारखे वातावरण निर्मळ होऊ दे

sakal_logo
By
शैलेश पेटकर

सांगली : कोरोनाचे संकट टळू दे. पहिल्यासारखे वातावरण निर्मळ होऊ दे, असे मागणे बेघरांनी गणरायाकडे घातले. येथील सावली बेघर निवारा केंद्रात बाप्पांचे जल्लोषी स्वागत करीत पर्यावरपूरक गणेशोत्सव सुरू आहे. केंद्रातील सारे रूग्ण कोरोनामुक्त झालेत. इतरांवरीलही संकट दूर व्हावे, अशी अपेक्षा बेघरांनी व्यक्त केली आहे. 

सांगलीसह महापालिका क्षेत्रात फिरणाऱ्या बेघरांना हक्काचा निवारा देण्यासाठी इन्साफ फौंडेशन आठ वर्षांपासून काम करीत आहे. केंद्राच्या दिनदयाळ अंत्योदय नागरीक उपजिवीका अभियानांतर्गत महापालिका आणि इन्साफ फौंडेशनच्या विद्यमाने दोन वर्षांपासून निवारा केंद्र सुरू केले आहे. फौंडेशनचे संस्थापक मुस्तफा मुजावर यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सुरू आहे. येथे आतापर्यंत शहरातील सर्व बेघरांना हक्काचा निवारा देण्यात आला. काही लोकांच्या कुटुंबियांचा शोध घेऊन त्यांना परत घरी पाठवण्यात आले. सद्या येथे 56 जण राहतात. अनेकजण व्याधीग्रस्त आहेत. त्याच्यावर तेथेच उपचार केले जातात. 

10 जुलै रोजी इथल्या निवारा केंद्रावर एकास कोरोनाची बाधा झाली. दोन दिवसात तेथील 63 जणांना बाधा झाली. प्रशासनाचे धाबे दणाणले. सांगलीकरांची नजर या केंद्राकडे लागली. प्रशासनाने तातडीने खबरदारी, उपाययोजना केल्या. फार हाय-फाय उपचार न घेता. केवळ अन्‌ केवळ उत्तम आहार, वेळेवर औषधे आणि बिनधास्तपणा या जोरावर जागतिक रोगावर सहज मात केली. एकही जिवीतहानी न होता हे केंद्र कोरोनामुक्त झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाचा गणेशोत्सवही जल्लोषात करण्यात आला. पर्यावरणपूरक मूर्ती प्रतिष्ठापना करून टाळच्या निनादात स्वागत करण्यात आले. नित्याने याठिकाणी गणरायाला प्रसाद दाखवला जात आहे. पूजा-अर्चा या बेघरांकडून केली जाते. 

संपादन : प्रफुल्ल सुतार

loading image
go to top