क्षणाचा मोह टाळल्यास आपले जीवन आनंदी आणि सुंदर होईल : गणेश शिंदे

aakalkoth
aakalkoth

अक्कलकोट - आपण आपल्या जीवनात वावरत असताना क्षणाचा मोह आणि लोभ टाळावा ज्याने आपले जीवन आनंदी आणि सुंदर होईल असे प्रतिपादन गणेश शिंदे यांनी केले.विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना गणेश शिंदे अहमदनगर हे बोलत होते. 

प्रारंभी मोहन चव्हाण, परमेश्वर जकापुरे, प्रदीप पाटील, ओमप्रकाश तळेकर, श्रीशैल पाटील यांच्या हस्ते दिवप्रज्वलन करून आजच्या चौथ्या पुष्पास प्रारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना माणूस हा आनंदी जीवन जगायला पाहिजे पण तो अति आशेने जागून स्वतः दुःखी राहतो आणि जीवनातला अर्थ गमावून बसतो. साधनांमध्ये जर आनंद राहिला असता तर भारतातील सर्व श्रीमंत माणसे ही सदा सुखी राहिली असती किंवा त्यांच्या वाट्याला दुःखच आले नसते पण असे कधीच होत नाही.सध्या माणसांची प्रवृत्ती दुसऱ्याच्या दुःखात आनंद व्यक्त करणे किंवा दुसऱ्याच्या आनंदात स्वतः दुःखी राहणे या प्रवृत्तीमुळे माणूस हा सतत आनंदाला पारखा होऊन बसतो. माणसाचं जीवनच मुळात सुंदर आहे पण आपल्या चुकीच्या वागण्याने त्याला आपणच का कुरूप बनवितो हे न समजलेले कोडे आहे.माणूस शंभर वर्षे स्वतःसाठी जगाला ती व्यर्थच आहे पण दुसऱ्यासाठी आपण जगणे आणि त्यात आनंद मानणे यातच आपला मोठेपणा आहे. आई वडिलांनी आपल्या मुलात धमक निर्माण करावे ज्याने मुलाचे जीवन सुंदर बनेल हे ध्यानात ठेवावे. जे पेरलं तेच उगवेल हेच लक्ष्यात ठेवावे.

यावेळी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, मंगल कल्याणशेट्टी, अमर पाटील, विक्रम शिंदे, चंद्रकांत दसले, अतुल कोकाटे, अनिल तोतला, अशोक येणगुरे, शशिकांत लिंबीतोटे, संतोष जिरोळे, मल्लिनाथ मसुती, विलास कोरे, भीमराव साठे, रुपाली येणगुरे, डॉ.विवेक करपे, जितेंद्रकुमार जाजू, गुरुपादप्पा आळगी, नितीन पाटील, महेश कापसे, चंद्रकांत दसले, एस.व्ही.कलबुर्गी, व्ही.एस.तळवार, मलकप्पा भरमशेटटी, विलास बिराजदार, आदीसह रसिक श्रोते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com