‘कान्स’ चित्रपट महोत्सवासाठी ‘अव्यक्त’ लघुपटाची निवड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

सांगली - सांगलीतील कौशल पाटील याने बीई सिव्हिल व मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले असून त्याला फोटोग्राफीचा छंद आहे. छंद जोपासतानाच त्याने नावीन्यपूर्णतेचा ध्यास घेतला. ओंकार मोदगी यांच्याशी ओळखीनंतर लघुपट बनवण्याचा निर्धार केला. ओंकारने वडील आणि मुलाच्या नातेसंबंधावर प्रकाशझोत टाकला. कौशलने त्याला निर्मितीचा आकार दिला. त्यातूनच ‘अव्यक्त’ हा लघुपट निर्माण झाला. पहिल्याच प्रयत्नात हा लघुपट ‘फ्रान्स’ येथे १७ व १८ मे रोजी होणाऱ्या ७० व्या ‘कान्स’ चित्रपट महोत्सवात कोर्ट  मेट्रेज शॉर्ट फिल्म कॉर्नर या विभागात निवडला गेला.

वडील-मुलाच्या नात्याला स्पर्श करणाऱ्या ‘अव्यक्त’ लघुपटात प्रसिद्ध रंगकर्मी अनिरूद्ध खुटवड, राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता पार्थ भालेराव यांनी काम केले आहे. लघुफिल्मची सहनिर्मिती सांगलीच्या कौशल पाटीलने केली आहे. कौशल हा माजी महापौर सुरेश पाटील यांचा चिरंजीव आहे. तर देवदत्त बाजी याने  संगीत दिले आहे. सर्वसामान्यपणे वडील व मुलामध्ये प्रेमाचे संबंध असले तरी संवाद कमीच असतो. दोघांमध्ये मित्रत्वाचे संबंध असले तरी संवादाची दरी असते. अशावेळी ही दरी कमी करण्याचा प्रयत्न आई करते. परंतु आईचे अकाली निधन झाल्यानंतर दोघांमध्ये होणारी अस्वस्थता व त्यातून वाढलेली जवळीक यावर लघुपट निर्माण केला आहे.

फ्रान्समधील कान्स चित्रपट महोत्सवाकडे जगाचे डोळे लागलेले असतात. सामाजिक विषयावरील ‘अव्यक्त’ लघुपटाकडून सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

Web Title: avyaktya documentary selected to kans movie mahotsav