आवाडेंच्या ताराराणी पक्षाची नोंदणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - काँग्रेसचे माजी मंत्री व जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी कॉंग्रेसला रामराम करत ताराराणी पक्षाची स्थापना केली. इचलकरंजी, हातणंकलेसह शिरोळ विधानसभा मतदारसंघातून ते उमेदवार उभे करणार आहेत. या पक्षाला नुकतीच निवडणूक आयोगाने मान्यताही दिली, मात्र पक्षाचे निवडणूक चिन्ह मात्र अंतिम झालेले नाही.

या तिन्ही मतदारसंघातील प्रभावी गट, व्यक्‍ती, संस्थांशी आवाडे यांनी संपर्क सुरू ठेवला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणचे वंचित आघाडीसोबतही वाटाघाटी सुरू आहेत. इचलकरंजीतून प्रकाश आवाडे, तर हातकणंगलेतून जि. प.चे माजी समाजकल्याण समिती सभापती किरण कांबळे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. 

कॉंग्रेसमधून बाहेर पडत श्री. आवाडे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचा राजानीमा दिल्यानंतर त्यांचे नाव विविध पक्षांशी जोडले गेले. मात्र त्यांनी ताराराणी पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंद करत या पक्षाच्या चिन्हावरच लढण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसमधून बाहेर पडतानाच भाजप, 370 कलम रद्द करण्याचा निर्णय याबाबत आवाडे यांनी समाधान व्यक्‍त केले. त्यामुळे आवाडे नेमके कोणत्या पक्षात जाणार, या चर्चेला उधाण आले होते. ते शिवसेनेतही जातील, अशी चर्चा होती. मात्र नवीनच पक्ष काढून त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. 

आंबेडकरांसोबत आणखी एक बैठक 
शिरोळ येथील उमेदवारी निर्णय बाकी आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित विकास आघाडीसोबत आवाडे गटाच्या वाटाघाटी सुरू आहेत. आतापर्यंत दोन बैठक झाल्या असून आणखी एक बैठक घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awade Tararani Party registration