नगर जिल्हा सहकारी बॅंकेस "सहकार निष्ठ' पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

नगर : नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस "सहकार निष्ठ' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा बॅंकांसाठी राज्य सरकारतर्फे हा पुरस्कार दिला जातो.

नगर : नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस "सहकार निष्ठ' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा बॅंकांसाठी राज्य सरकारतर्फे हा पुरस्कार दिला जातो.

महाराष्ट्र सरकारच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अवर सचिव रमेश शिंगटे यांनी काल राज्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थांना सहकार महर्षी, सहकार भूषण व सहकार निष्ठ पुरस्कार शासनाच्या परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहेत. महाराष्ट्र राज्यातील जिल्हा सहकारी बॅंकेच्या एकूण कामकाजासंदर्भात अभ्यास करून सरकारची समिती या पुरस्कारासाठी राज्यातील जिल्हा बॅंकेची निवड करते. लवकरच हे पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.

बॅंकेला "सहकार निष्ठ' पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बॅंकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर म्हणाले, ""अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेस स्थापनेपासून अतिशय उत्कृष्ट नेतृत्व लाभले व बॅंकसेवक कार्यक्षमतेने काम करीत आहेत. त्यामुळे बॅंकेला हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार बॅंकेचा सन्मान आहे. बॅंकेचे सभासद, ठेवीदार व शेतकऱ्यांचा बॅंकेवर विश्वास असल्याने बॅंकेची प्रगती होते आहे. सहकार निष्ठ पुरस्कार मिळाल्याने बॅंकेच्या संचालक मंडळाने समाधान व्यक्त केले.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Award declared for Nagar District Co-operative Bank