इथे लाऊडस्पीकरद्वारे जनजागृती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

सांगली ः कोरूना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगली आणि मिरजेतील लोकांनी आता घरातच मुक्काम ठोकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, अशा वेळी लोकांना राज्य शासनाच्या तातडीच्या सूचना आणि जिल्हा प्रशासनाचे धोरण कळविण्यासाठी सांगली आणि मिरज शहरातील मशिदीवरील लाऊडस्पीकरद्वारे माहिती पुकारली जात आहे. 

सध्या काही मोजक्‍या मशीदमधून हा प्रयोग सुरू केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मुस्लिम बांधव घरातूनच नमाज अदा करत आहेत. बाजारपेठा, वाहतूक, अत्यावश्‍यक सेवा याविषयीची नवीन धोरणे सातत्याने समोर येत आहेत. राज्य शासन वेगवेगळे निर्णय घेऊन लोकांना सावध करत आहे. ही माहिती वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणीवरून लोकांपर्यंत पोहोचत आहेच. शिवाय स्थानिक पातळीवर तातडीची माहिती लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी मशिदीवरील लाऊड स्पीकरचा उपयोग करावा, असा प्रस्ताव काही मान्यवरांनी दिला. 

त्यानुसार काही ठिकाणी कामही सुरू झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चांदणी चौकातील बिलाल मशीद, संजय नगर येथील आक्‍ला मशिद, कोल्हापूर रस्त्यावरील चॉंद-तारा मशीद, नळ भागातील हसन मशिद याठिकाणी लाऊड स्पीकर वरून माहिती पुकारण्याचे काम सुरू आहे. सांगली आणि मिरज मध्ये सर्व मशिदी वरुन अशा पद्धतीची सेवा देण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. प्रशासनाच्या सहकार्याने आणि लोकांच्या सेवेसाठी ही सुविधा सुरू ठेवण्यात आल्याचे मुस्लिम बांधवांनी सांगितले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness through loudspeakers