जिल्हा परिषदेतही आता पुरस्कार वापसी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

कोल्हापूर - गेल्या तीन वर्षांपासून शाहू पुरस्कारांचे वितरण रखडले आहे. सर्वच पदाधिकाऱ्यांना सभागृहाची मुदत संपत आली तरी वेळ मिळत नसल्याने काही सदस्य हा पुरस्कार स्वत:हून परत करण्याच्या विचारात आहेत. मुदत संपत आल्याने ‘अर्थपूर्ण चर्चेत’ तसेच ‘अन्य’ कामांत गुंतल्यामुळे सर्वच पदाधिकाऱ्यांबद्दल अस्सल ‘कोल्हापुरी’ भाषेत भावना व्यक्‍त होत आहेत.

विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळालेल्यांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील व उपाध्यक्ष शशिकांत खोत यांचाही समावेश आहे. 

सहा महिन्यांपासून मंत्र्यांच्या हस्ते हा कार्यक्रम करण्याचा विचार जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, उपाध्यक्ष खोत यांच्यासह सभापती किरण कांबळे, अभिजित तायशेटे, सीमा पाटील, ज्योती पाटील हे पदाधिकारी बोलून दाखवत आहेत; पण आजअखेर त्यांना एखाद्या मंत्र्यांची वेळ मिळवता न आल्याने त्यांच्या ‘कुवती’बद्दलच आता शंका उपस्थित करण्यात येऊ लागली आहे.

जिल्हा परिषदेच्या वतीने सभागृहात विषय मांडणाऱ्या, चांगले काम करणाऱ्या सदस्यांना राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार दिला जातो. गेल्या तीन वर्षांपासून हे पुरस्कार जाहीर होतात; पण त्याचे वितरण सभागृहाची मुदत संपत आली तरी होत नसल्याने आता पुरस्कार जाहीर झालेल्यांमधून संतप्त भावना व्यक्‍त आहेत. 

पुरस्कार मिळाल्यांमध्ये अध्यक्ष पाटील, उपाध्यक्ष खोत यांच्यासह अरुण 
इंगवले, शालिनी शेळके, रतिपौर्णिमा कामत, आकांक्षा पाटील, विकास कांबळे, मेघाराणी जाधव, भाग्यश्री पाटील, अनिता माने, शैलजा पाटील, दीपा पाटील, देवानंद कांबळे, सुजाता पाटील व स्मिता गवळी यांचा समावेश आहे.

चांगले काम करणाऱ्यांचा गौरव
जिल्हा परिषदेच्या वतीने सभागृहात विषय मांडणाऱ्या, चांगले काम करणाऱ्या सदस्यांना राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार दिला जातो. गेल्या तीन वर्षांपासून हे पुरस्कार जाहीर होतात. या पुरस्काराच्या वितरणाबाबत वारंवार चर्चा करूनही पदाधिकारी त्याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाबाबत एकदाही पदाधिकाऱ्यांनी एकत्रित चर्चा केली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता हा पुरस्कार परत करण्याच्या विचारात काही सदस्य आहेत.

Web Title: awrad return in zp