esakal | अयोध्येचे राम मंदिर जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल : दादा वेदक

बोलून बातमी शोधा

Ayodhya's Ram temple to become cultural capital of the world: Dada Vedak}

अयोध्येत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र  भविष्यात जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल, असे माहिती विश्‍व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संयुक्त महामंत्री दादा वेदक यांनी सांगितले.

अयोध्येचे राम मंदिर जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल : दादा वेदक
sakal_logo
By
घनशाम नवाथे

सांगली : अयोध्येत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्यावतीने उभारल्या जात असलेल्या राम मंदिराचे कार्य गतिमान बनले आहे. भविष्यात हे मंदिर जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल. या महान कार्यासाठी रामभक्तांचा सहभाग निश्‍चित करण्यासाठी "निधी समर्पण अभियान' संपूर्ण देशभर होत आहे. "मंदिर भव्य बनायेंगे' हा संकल्प घेऊन सांगली जिल्ह्यातही हे अभियान राबवले जात असल्याची माहिती विश्‍व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संयुक्त महामंत्री दादा वेदक यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले,""पाच शतके चाललेला रामभक्तांचा संघर्ष यशस्वी होऊन 9 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने सत्याचा पूर्णपणे स्वीकार केला. त्यानंतर मंदिराचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना केली. न्यासाच्या विनंतीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्टला भूमिपूजन व शिलापूजन केले.

अयोध्येतील प्रस्तावित मंदिर तीन मजल्यांचे असून प्रत्येक मजल्याची उंची 20 फुटांची आहे. मंदिर 161 फूट उंचीचे असेल. त्यावर पाच शिखरे असतील. संपूर्ण बांधकाम केवळ दगडातील असेल. बांधकामानंतर संपूर्ण जगातील रामभक्तांचा संपर्क, समन्वय, सहयोग यामुळे राम मंदिर जगाची सांस्कृतिक, अध्यात्मिक राजधानी बनेल.'' 

ते पुढे म्हणाले,""राम मंदिराच्या कार्यात भक्तांचा सहभाग निश्‍चित करण्यासाठी निधी समर्पण अभियान सुरू आहे. पहिल्या टप्प्यात दोन हजार रुपये ते कोटीहून अधिक मोठा निधी स्वीकारला जात आहे. दुसऱ्या टप्प्यात देशातील 11 कोटी कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये दहा रुपयांपासून हजार रुपयापर्यंत निधी स्वीकारून त्याचे कुपन दिले जाईल.

जिल्ह्यात 31 जानेवारीअखेर 550 गावांतील साडे पाच लाख कुटुंबापर्यंत पोहोचून अभियान राबवले जाईल. त्यासाठी दोन हजार महिला आणि 3500 कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. राम ही राष्ट्राची अस्मिता असून मंदिराच्या रूपाने राष्ट्रमंदिराची उभारणीचे कार्य केले जात आहे.'' 

जिल्हा संघचालक विलास चौथाई, प्रा. सुनील कुलकर्णी, कार्यवाह नितीन देशमाने, सुहास जोशी, संजीव चव्हाण, योगेश शिरगुरकर, शैलेंद्र तेलंग उपस्थित होते. 

संपादन : युवराज यादव