आयुष्यमान योजनेचा फुसका बार 

तात्या लांडगे
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांवर उपचार करण्याकरिता राज्यातील 500 रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. त्या धर्तीवर आयुष्यमान भारत योजनेतही त्याच रुग्णालयांचा समावेश करावा असा प्रस्ताव मागील महिन्यात सरकारकडे दिला आहे. तुर्तास राज्यातील 81 शासकीय रुग्णालयातूनच रुग्णांवर उपचार केले जात आहेत. 
- डॉ.सुधाकर शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुष्यमान भारत योजना

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वसामान्य रुग्णांना खासगी व शासकीय रुग्णालयात पाच लाखांपर्यंत मोफत उपचार घेता यावेत या उद्देशाने 23 सप्टेंबर 2018 पासून आयुष्यमान भारत योजना सुरु केली. मात्र, या योजनेसाठी राज्यातील 84 लाख कुटुंब पात्र असूनही त्यासाठी फक्‍त 81 रुग्णालयांचीच निवड केली असून तेही शासकीय रुग्णालयेच असल्याचे दिसून येते. 

आयुष्यमान भारत योजनेंतर्गत मागील तीन महिन्यात राज्यातील फक्‍त एक हजार 683 रुग्णांनीच या योजनेंतर्गत उपचार घेतले आहेत. दुसरीकडे या योजनेत रुग्णांना पाच लाखांपर्यंत एक हजार 321 आजारांवर उपचार घेता येतात तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत दिड लाखांपर्यंत 971 आजारांवर उपचार घेता येतात. तसेच आयुष्यमान भारत योजनेचे प्रमुख वैशिष्ट म्हणजे देशातील कोणत्याही रुग्णालयात रुग्णांना उपचार घेता येतात. मात्र, एकीकडे महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत दरवर्षी राज्यातील दिड ते दोन लाख रुग्ण उपचार घेतात परंतु, रुग्णालयांची संख्या अपुरी असल्याने बहुतांशी रुग्ण आयुष्यमान भारत योजनेसाठी प्रतीक्षा न करता महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे पहायला मिळते. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत राज्यातील 500 रुग्णालये असून आयुष्यमान भारत योजनेत फक्‍त 81 रुग्णालयेच आहेत. 

आयुष्यमान ची सद्यस्थिती 
पात्र कुटुंब संख्या 
84 लाख 
नियुक्‍त रुग्णालये 
81 
प्रस्तावित रुग्णालये 
419 

महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांवर उपचार करण्याकरिता राज्यातील 500 रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. त्या धर्तीवर आयुष्यमान भारत योजनेतही त्याच रुग्णालयांचा समावेश करावा असा प्रस्ताव मागील महिन्यात सरकारकडे दिला आहे. तुर्तास राज्यातील 81 शासकीय रुग्णालयातूनच रुग्णांवर उपचार केले जात आहेत. 
- डॉ.सुधाकर शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुष्यमान भारत योजना

Web Title: Ayushman scheme failed in Solapur