आयुष्यमान भारत या योजनेचा मंगळवेढ्यातील कुटुंबांना होणार लाभ

हुकूम मुलाणी
सोमवार, 30 एप्रिल 2018

मंगळवेढा (सोलापूर) : केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या आयुष्यमान भारत या योजनेत तालुक्यातील 17829 कुटूंबांना लाभ होणार असून या योजनेस 21 मार्च रोजी मंजूरी दिली असून पात्र कुटुंबाला उपचारासाठी पाच लाखांचा खर्च शासन भरणार आहे.           

मंगळवेढा (सोलापूर) : केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या आयुष्यमान भारत या योजनेत तालुक्यातील 17829 कुटूंबांना लाभ होणार असून या योजनेस 21 मार्च रोजी मंजूरी दिली असून पात्र कुटुंबाला उपचारासाठी पाच लाखांचा खर्च शासन भरणार आहे.           

याबाबत आज (ता.30) ग्रामसभेत याची माहिती देण्यात आली. यामध्ये सन 2011 च्या सामाजिक व आर्थिक जातीनिहाय सर्वेतुन पात्र ठरलेल्या ग्रामीण विभागातील कच्चे भिंत किंवा छप्पर असलेले एका खोलीचे घर, 16 ते 59 वयोगटातील पौढ व्यक्ती नाही,16 ते 59 वयोगट पौढ नाही पण महिला कुटुंब प्रमुख असलेले, दिव्यांग व शारीरिक सक्षम नाही अशी व्यक्ती, अनुसुचित जाती व जमाती, भुमीहीन कुटूंब, बेघर, तर शहरी विभागातील  कचरा वेचणारे, भिकारी, घरकाम करणारे, रस्त्यावर विक्री करणारे/फेरीवाले/गटई कामगार, बांधकाम कामगार, झाडू मारणारे, रिक्षा चालक, धोबी, चौकीदार, वेटर, हमाल या कुटूंबाची निवड करण्यात आली असून एक ते सात मे पर्यंत मोबाईल क्रमांक, शिधा पत्रिका क्रमांक, कुटुंबाची सद्यस्थिती (नाव वाढविणे, कमी करणे) हे कुटूंबाला भेट देऊन त्या कुटुंबाची माहिती संकलित करणार असून या कुटुंबात कमी झालेल्या व्यक्ती कमी आणि वाढलेल्या व्यक्ती वाढविण्यात येणार असून वापरात असलेला मोबाईल क्र आदी माहिती संकलित केली जाणार आहे.

यात तालुक्यातुन अकोला 96,आंधळगाव 321, अरळी 281, आसबेवाडी 98 ,बठाण 250 ,भाळवणी 173, भालेवाडी 91, बावची 119, भोसे 583, बोराळे 529 ,ब्रम्हपुरी 254, चिक्कलगी 153, देगाव 109,धर्मगाव 74, ढवळस 205, डिकसळ 82,डोणज 373 ,फटेवाडी 66, डोंगरगाव 311, गणेशवाडी 141, घरनिकी 110 ,गोणेवाडी 490, गुंजेगाव 370, हाजापूर 339 ,हुन्नुर 353 ,हिवरगाव 80 ,हुलजंती 450 ,जालीहाळ 114, जंगलगी 148, जित्ती 158, जुनोनी 195, कचरेवाडी 241,कागष्ट 80, कात्राळ 140,कर्जाळ 51, खडकी 156,  खवे 64 ,खोमनाळ 123, खुपसंगी 436, लमाणतांडा 172, लवंगी 180 ,लक्ष्मी दहीवडी 393 ,लेंडवे चिंचाळे 159,लोणार 295, माचणूर 123, म.शेटफळ 105, महमदाबाद हुन्नुर 261, मल्लेवाडी 156, माळवाडी 32, मारोळी 153,मानेवाडी 181 ,मंगळवेढा 308, मारापूर 246 ,मरवडे 673, मुढवी 141 ,मुंढेवाडी 96, नंदेश्‍वर 642, नंदूर 391, निंबोणी 368 ,पडोळकरवाडी 81,पाठखळ 264, पौट 172, रहाटेवाडी 42 ,रडडे 800, रेवेवाडी 214, सलगर बु 504, सलगर खु 123 ,शेलेवाडी 122, शिरसी 125 ,शिरनांदगी 184, शिवनगी 137, सिध्दापूर 391,सिध्दनकेरी 34, सोडडी 133, तळसंगी 419, तामदर्डी 60, तांडोर 125, उचेठाण 180, येळगी 59, येड्राव 148,  संत चोखोमेळा नगर 0 ,संत दामाजी नगर 0 यांचा समावेश आहे.

या योजनेत पात्र कुटुंबातील सदस्यांनी कौटुंबिक माहिती आशा सेविकाकडे देऊन सहकार्य करावे जेणेकरुन भविष्यात या योजनेचा लाभ मिळणे शक्य होईल, असे आरोग्य अधिकारी डाॅ. नंदकुमार शिंदे यांनी सांगितले.  

Web Title: ayushyaman bharat benefited to mangalwedha tehasil families