बी. एन. पाटील यांच्या कारकिर्दीतील फायलीच गायब 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषदेतील वादग्रस्त माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्यावरील कारवाईचा अहवाल शिक्षण आयुक्‍तांकडे पाठविला आहे. अहवालात गंभीर तक्रारी असल्याचे समजते. तत्कालीन शिक्षणाधिकारी बी. एन. पाटील यांच्या कारकिर्दीतील मान्यता दिलेल्या फायलीच गायब झाल्याचे नवीनच प्रकरण चौकशीत समोर आल्याचे समजते. त्यामुळे श्री. पाटील यांच्याही कारभाराची चर्चा आता जिल्हा परिषदेत सुरू झाली आहे. 

दरम्यान, सौ. शिंदे यांची चौकशी सुरू असताना माध्यमिक शिक्षण विभागात ठाण मांडून बसणाऱ्या आणि आजपर्यंत कोठेही चर्चेत नसलेल्या पण सर्व कामात जोडण्या लावून देणाऱ्या एका "चाचा'च्या नावाचीही तक्रार चौकशी अधिकाऱ्यांकडे आली आहे. 

माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचारी सावर्डेकरला सुटीदिवशी लाच घेताना पकडल्यानंतर यामागचा सूत्रधार शोधण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी या विभागाची स्वच्छता मोहीम हाती घेतली. पहिल्या टप्प्यात हातकणंगले पंचायत समितीचे अधीक्षक श्री. वाठारकर यांची समिती नियुक्‍त केली. या चौकशी समितीने विभागाचे दफ्तर तपासून त्यामध्ये आढळलेल्या त्रुटी त्यात नमूद करून तो अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला. अहवालात काही कर्मचाऱ्यांबरोबरच विभागातील "चाचां'वरही ठपका ठेवल्याचे समजते. अहवालावर विभागातील तीन कर्मचाऱ्यांची बदली अन्य विभागात केली. 

तक्रारदारांची रीघ 
ज्योत्स्ना शिंदे यांच्या चौकशीसाठी अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्‍ती झाली. चौकशी अधिकारी म्हणून श्री. देशमुख यांची नियुक्‍ती झाल्याचे समजताच सौ. शिंदे यांच्याबाबतीतील तक्रारी देण्यासाठी श्री. देशमुख यांच्या कार्यालयात तक्रारदारांची रिघ लागली. तक्रारींची श्री. देशमुख यांनी चौकशी करून अहवाल डॉ. खेमणार यांना सादर केला. त्यांनी तो शिक्षण आयुक्‍तांकडे पाठविला आहे.

Web Title: B. N. Patil's career missing files