Vidhan Sabha 2019 : भाजप-शिवसेना युतीला महाराष्ट्रात मिळेल बहुमत : येडियुरप्पा

Vidhan Sabha 2019 : भाजप-शिवसेना युतीला महाराष्ट्रात मिळेल बहुमत : येडियुरप्पा

सोलापूर : "विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला दोन तृतीयांश बहुमत मिळेल. राज्यात व देशात भाजपचीच सत्ता असल्याने मतदार निश्‍चित महायुतीच्या बाजूने कौल देतील आणि युतीचे सरकार पुन्हा सत्तारूढ होईल'', असा विश्वास कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केला. 

सोलापुरातील भाजप-शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी ते बुधवारी आले होते. पुढील दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्यांनी विमातळावर 'सकाळ'शी संवाद साधला. माजी आमदार रवी पाटील उपस्थित होते. 

येडियुरप्पा म्हणाले , "मी जिथे-जिथे सभेला गेलो तिथे भाजपला चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे राज्यात भाजप व मित्रपक्षाला निश्‍चितच दोन तृतीयांश बहुमत मिळेल. विशेषतः लिंगायतबहूल मतदार असलेल्या भागामध्ये माझ्या सभा झाल्या असल्या तरी सर्वच जाती-धर्माच्या लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सोलापुरातील सभेलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सोलापूर व परिसरातील महायुतीचे उमेदवार निश्‍चित विजयी होतील. मोदी व फडणवीस सरकारने केलेल्या कामाची पावती म्हणून मतदार यंदाही युतीच्या बाजूने कौल देतील, असा दावा त्यांनी केला.

सोलापूर महापालिका, महाराष्ट्र आणि देशात भाजपची सत्ता आहे. संपूर्ण राज्यात भाजपच्या बाजूने वातावरण आहे. त्याचा निश्‍चित फायदा होईल. लोक आता जात, पंथ पाहून मतदान करत नाहीत, तर लोकांना विकास आणि सुरक्षा हवी आहे. तिन्ही ठिकाणी भाजपचीच सत्ता असल्याने सोलापूर शहर व जिल्ह्याचा विकास निश्‍चित होईल, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com