काकांच्या पाठिंब्याने पुतण्याला बळ; बबन आवताडेंचा समाधान यांना पाठिंबा

हुकूम मुलाणी 
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

मंगळवेढा : पंढरपूर विधानसभा निवडणूकीत आणखीन चुरस निर्माण झाली असून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे यांनी आपल्या गटाचा पाठिंबा अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना जाहीर केला. यामुळे चुलत्याच्या पाठिंब्याने पुतण्याला आता बळ आले.

मंगळवेढा : पंढरपूर विधानसभा निवडणूकीत आणखीन चुरस निर्माण झाली असून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे यांनी आपल्या गटाचा पाठिंबा अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना जाहीर केला. यामुळे चुलत्याच्या पाठिंब्याने पुतण्याला आता बळ आले.

येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय तालुक्यातील विविध सहकारी संस्था व ग्रामपंचायतीमधील कार्य पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी हा निर्णय जाहीर केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे त्यांनी आपला पाठिंबा भाजपाचे उमेदवार खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना दिला. तालुक्यांमध्ये दोन साखर कारखाने, एक सूतगिरणी, कृषी उद्योग संघ, खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती निम्म्याहून अधिक ग्रामपंचायती जिल्हा परिषद व पंचायत समितीवर वर्चस्व असलेली बबनराव आवताडे यांनी या निवडणुकीत अंतरावर थांबले.

तालुक्यातील राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू होती त्यामुळे त्यांची भूमिका या निवडणुकीसाठी निर्णायक वळणावर येऊन ठेपली. गत निवडणुकीमध्ये साखर कारखाना व सूतगिरणी व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वर्चस्व नसताना देखील 43 हजार मताधिक्य मतदारसंघात मिळवून देण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती अशा परिस्थितीत या निवडणुकीत त्यामुळे ते काय भूमिका घेणार याविषयी उत्सुकता लागली असताना त्यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भूमिका स्पष्ट करून समाधान आवताडे यांना पाठिंबा दिला.

झालेल्या घटनेवर पडदा दाखवून तालुक्याच्या विकासासाठी बबनराव आवताडे यांनी भक्कम आधार दिल्यामुळे आणखीन काय वेगाने विकासाचे काम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गत निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मंगळवेढ्याच्या बरोबरीने पंढरपूर तालुक्यातील मतदार आपल्याला सहकार्य करणार आहेत.
- समाधान आवताडे अपक्ष उमेदवार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baban Aawtade supports Samadhan Aawtade for vidhansabha elections