सोलापूर - क्रीडा कार्यालयाच्या दुर्लक्षाने फत्तेसिंह क्रीडांगणाची वाताहात 

राजशेखर चौधरी
बुधवार, 11 जुलै 2018

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट येथील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले व खेळाडू,जेष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी यांना सोयीचे असलेल्या फत्तेसिह क्रीडांगणाची जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या कार्यालयाच्या दुर्लक्षाने वाताहात झाली आहे.

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट येथील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले व खेळाडू,जेष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी यांना सोयीचे असलेल्या फत्तेसिह क्रीडांगणाची जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या कार्यालयाच्या दुर्लक्षाने वाताहात झाली आहे.

सन २०१७ च्या सहा फेब्रुवारीस तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली त्यावर्षी करावयाच्या कामास मंजुरी देण्यात आली होती.त्यावेळी क्रीडा खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पन्नास लाख रुपयांचे अनुदान या क्रीडांगणाच्या विकासासाठी निधी उपलब्द होता.त्यानंतर संरक्षक भिंत, रनिंग ट्रॅक, पाण्याची सुविधा, खेळाचे साहित्य, मैदानाची डागडुजी, शौचालय आदी कामे घेतली जाणार असून या मैदानावर कायमस्वरूपी कार्यालय आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले गेले होते.

तब्बल त्याला आता पंधरा महिने उलटली अंदाजपत्रक तयार करणे आणि निविदा काढणे यातच दिवसामागून दिवस गेले आहेत.अद्याप एक रुपयांचे देखील काम याठिकाणी सुरू नाही.मैदान एका पावसात संपूर्ण चिखल होते,पूर्ण पाण्याचा निचरा होत नाही,संरक्षक भिंत नाही कुणीही वाहन घेऊन यावे आणि फेरी मारून जावे, कार्यालयाचे दरवाजे अज्ञातांनी तोडले आहेत. त्यात कुणीही जाऊन वर खाली प्रवेश मिळवू शकतो अशी स्थिती आहे.

खेळाच्या सुविधा नाहीत,मैदानाला सुरक्षा रक्षक नाही,चारही बाजूने मैदानावर सहज प्रवेश यासह अनेक समस्या या मैदानावर आहेत.पण मागील अनुदानच खर्ची पडण्याची तसदी क्रिडाधिकारी घेत नाहीत.चालू वर्षीचे अनुदान किती आणि कोणते कामे करायची याचा पत्ता नाही.जेष्ठ नागरिक व महिला सकाळ व सायंकाळी फिरायला येतात पण वाहनधारक ट्रॅकवरच वाहन चालवितात आणि मैदानाला कुणीच वाली नाही किंवा कुणाचेच नियंत्रण नाही अशी सध्याची स्थिती आहे.जिल्हाधिकारी यांनी याकामी लक्ष घालावे अशी नागरिकांची मागणी होत आहे.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी चार वर्षांपूर्वी लावून बहरलेली ११० झाडे,सलग चार वर्षे दर शनिवारी त्यांना दिलेले पाणी, बसण्यास भरपूर बाकडे,मुख्यगेट सजावट, आणि पर्यावरणपूरक संदेश या सकारात्मक बाबी केल्या आहेत, या बाबी मात्र सुखावह आहेत.पण ज्यांचे मूळ काम आहे आणि भरपूर निधी असूनही कामे होत नाहीत ते क्रीडा खाते मात्र इतर कामासाठी दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक मात्र प्रचंड नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

Web Title: bad condition of fattesinha ground due to ignorance of management in akkalkol