श्रीक्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्गाची दुरावस्था

सूर्यकांत बनकर
गुरुवार, 28 जून 2018

सध्या तरी नाथभक्तांसाठी पंढरीची वाट खाचगळग्यांचीच असून येणाऱ्या कालावधीत तरी प्रशासन यात दुरुस्ती करुन नाथांचा वनवास संपविणार का?, हाच खरा प्रश्न आहे.

करकंब (जि.सोलापूर) : पंढरीच्या आषाढी वारीत मानाचे तीन नंबरचे स्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्गाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून अनेक ठिकाणी या मार्गावर खडी उचकटली आहे. त्यामुळे सध्या तरी नाथभक्तांसाठी पंढरीची वाट खाचगळग्यांचीच असून येणाऱ्या कालावधीत तरी प्रशासन यात दुरुस्ती करुन नाथांचा वनवास संपविणार का?, हाच खरा प्रश्न आहे.

श्रीक्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या पालखीस आषाढी वारीमध्ये तीन नंबरचे महत्वाचे स्थान आहे. तीस हजार हून भाविकांची संख्या असणाऱ्या या पालखी सोहळ्याचा बहुतांश प्रवास ग्रामीण भागातून होतो. मात्र या मार्गावर अनेक ठिकणी रस्त्यांची दुरावस्था झाली असून रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढलेली आहेत. याबाबत पालखी सोहळा प्रमूख रघुनाथबुवा गोसावी (पालखीवाले) दरवर्षी शासनाकडे लेखी पाठपुरावा करतात. यावर्षीही त्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमूख यांच्याकडे सोलापूर जिल्ह्यात पालखीसोहळ्यास येणाऱ्या अडचणीसंदर्भात निवेदन देवून त्या सोडविण्याची मागणी केली आहे. 

श्रीसंत एकनाथ महारांजांचा पालखी सोहळा अरण येथून करकंब येथे पंढरपूर तालुक्यात प्रवेश करतो. मात्र अरण ते करकंब हद्दीपर्यंतच्या पालखीमार्गाचे गतवर्षी करण्यात आलेले खडीकरण सध्या उचकटले असून रस्ता खडीने माखला आहे. त्यामुळे या मार्गावरुन पालखी सोहळा पुढे जाताना भाविकांना अतिशय त्रास होणार आहे. शिवाय करकंब ते शेवते मार्गावरही अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करायला अजून तीन आठवड्याचा कालावधी आहे. या कालावधीत तरी सोहळाप्रमुखांनी दिलेल्या निवेदनाचा विचार करुन पालखीमार्गाची दुरुस्ती होणार का आणि नाथांचा विठुरायाच्या भेटीतील वनवास संपणार का, हा खरा प्रश्न आहे. 

पालखी सोहळा प्रमूख रघुनाथबुवा गोसावी यांच्या मागण्या -

Web Title: Bad condition of palkhi road of sant eknath maharaj at paithan