जिल्हे, तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्याची चाळण

कुलभूषण विभूते
मंगळवार, 5 जून 2018

वैराग (जि.सोलापूर) : सारोळे ( ता. बार्शी ) आणि काटी ( ता. तुळजापूर ) या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसरातील शेतकरी व प्रवाशांना गेली सोळा वर्षापासून वाहतुकीसाठी मरण यातना भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे सारोळे ग्रामस्थानी प्रखर आंदोलन करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. 
सारोळे ते काटी हा सोलापूर व उस्मानाबाद या जिल्ह्यांना व बार्शी व तुळजापूर या दोन तालुक्याना जोडणाऱ्या सिमेवरील सरहद्य रस्ता २००१ साली तयार करण्यात आला होता. याला आता 16 वर्ष पुर्ण होऊन गेली आहेत. 

त्यानंतर दोन्ही तालुक्यातील प्रशासनाने रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण केले. या रस्त्यावरून वैराग ते सारोळे मार्गे भांडेगांव एस.टी. च्या पाच फेऱ्या व सोलापूर ते काटी मार्गे सारोळे तीन अशा एस.टी.च्या फेऱ्या चालू आहेत. सिमेवरील शेतकऱ्याना हा दळण वळणासाठी महत्वाचा रस्ता आहे. जिल्हा प्रशासनाकडे मैल मजुर ( मैल कुली ) यांची नेमणूक नसल्यामुळे या रस्त्याची देखभाल गेल्या सोळा वर्षात झाली नाही. त्यामुळे रस्त्याची चाळण झाली. खड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डा हेच दिसत नाही. खडी, डांबर पुर्णपणे उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना रस्त्याच्या खाली बाजुच्या शेतकऱ्यांच्या शेतातून पर्यायी रस्त्याने प्रवास करावा लागतो.
त्यामुळे संबंधीत शेतकरी व वाहनधारक यांच्यात सतत भांडणे होत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरील वाहतुक पुर्णपणे बंद होते. पाच किमी लांबीचा हा रस्ता बार्शी आणि तुळजापूर या दोन्ही तालुक्याच्या हद्यीत येतो. त्यामुळे प्रवाशाना दोन तालुक्याच्या प्रशासनाकडे दाद मागावी लागते. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी करूनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे सारोळे ग्रामस्थानी उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन सादर करून आंदोलनाचा इशारा दिला आहे. 
या लेखी निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार रविंद्र गायकवाड, तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद आदींना पाठवण्यात आल्या आहेत.
 
माजी पंचायत समिती सदस्य विलास गाटे ( रा. सारोळे ) यांनी सांगितले की, सारोळे ते काटी हा रस्ता फक्त नावापुरताच राहीला आहे. आमच्या मागणीकडे अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांना लक्ष देण्यास वेळ नाही. दोन जिल्हयाच्या सिमेवर आम्ही वास्तव्य करतो हा आमचा अपराध आहे का? असा प्रश्न आम्हाला पडतो. जुलै पर्यंत रस्त्याचे काम सुरूं नाही केल्यास दहा जुलै रोजी तुळजापूर ते सोलापूर रस्त्यावर सांगवी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा गाटे यांनी दिला आहे.

Web Title: bad condition for Road to connecting districts and talukas