निकृष्ट कामामुळे रस्त्याचे काम पाडले बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

शिवथर - सातारा ते शिवथर रस्त्यादरम्यान वडूथ कालव्याजवळ काल दुपारी रस्त्याचे केलेले काम आज सकाळी उसकटल्यामुळे संबंधित ठेकेदाराने आज सकाळी अन्यत्र सुरू केलेले काम वडूथ पंचक्रोशीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंद पाडले. 

शिवथर - सातारा ते शिवथर रस्त्यादरम्यान वडूथ कालव्याजवळ काल दुपारी रस्त्याचे केलेले काम आज सकाळी उसकटल्यामुळे संबंधित ठेकेदाराने आज सकाळी अन्यत्र सुरू केलेले काम वडूथ पंचक्रोशीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंद पाडले. 

सातारा ते शिवथरपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, संबंधित ठेकेदार स्वतःच्या सवडीनुसार दुरुस्तीचे काम करत आहे. संबंधित ठेकेदाराने काल सायंकाळी साडेसात वाजता वडूथ कालव्याजवळ काम करून आज सकाळी दुसऱ्या ठिकाणी काम सुरू केले होते. मात्र, काल केलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने पूर्णपणे उसकटले गेल्याचे लक्षात आल्यावर पंचक्रोशीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराचे आज नवीन ठिकाणी सुरू केलेले काम बंद पाडून कालचे काम दर्जेदार करण्याची मागणी केली.  मात्र, ठेकेदाराने तात्पुरते काम थांबवून पुन्हा निकृष्ट दर्जाचे काम सुरू करून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कोलदांडा दाखवत काम सुरू ठेवले आहे. 

गेल्या तीन महिन्यांपासून कृष्णा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या मार्गावरून आज जरी अवजड वाहनांची वाहतूक सुरू असली, तरी संबंधित ठेकेदाराने गेले दोन महिने गप्प बसून आता काम पूर्ण करण्याचा घाट घातला आहे. मार्चअखेर काम संपवून बिल काढण्यासाठी संबंधित ठेकेदार शिवसेना पदाधिकारी व सामान्यांच्या भावनांचा विरोध झुगारत मनमानी करत असून, सार्वजनिक बाधंकाम विभाग ठेकेदाराला पाठीशी घालून हात मिळवणी करत आहे, की काय असा प्रश्न पदाधिकारी व सामान्य जनतेला पडला आहे. 

रास्ता रोको करण्याचा इशारा
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराची चौकशी सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी करावी, अन्यथा रास्ता रोको करू, असा इशारा शिवसेनेचे विभागप्रमुख हरिदास मोरे, शाखाप्रमुख ज्ञानेश्वर साबळे, पदाधिकारी व शिवसैनिकांनी दिला आहे.  

Web Title: bad road works taken off work