मोर्चासाठी सांगलीत आज प्रभात फेऱ्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

सांगली - अठरापगड जाती-जमातींचा संघटित हुंकार बहुजन क्रांती मोर्चाद्वारे प्रगट होईल, असा निर्धार संयोजकांनी सोमवारी व्यक्त केला. गुरुवारी (ता. 19) येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे.

सांगली - अठरापगड जाती-जमातींचा संघटित हुंकार बहुजन क्रांती मोर्चाद्वारे प्रगट होईल, असा निर्धार संयोजकांनी सोमवारी व्यक्त केला. गुरुवारी (ता. 19) येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे.

लाखोंचा जनसमुदाय सहभागी होईल. जागृतीचा भाग म्हणून मंगळवारी (ता. 17) जिल्हाभर प्रभात फेऱ्या काढण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले. मोर्चा मराठाविरोधी नव्हे, तर मराठा समाजाचे अन्य जाती- जमातींशी असलेले नाते घट्ट करण्यासाठी आहे, असा दावा संयोजकांनी केला आहे. माजी महापौर विवेक कांबळे, अरुण खरमाटे, दत्तात्रेय घाडगे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: bahujan kranti morcha in sangli

टॅग्स