नगरसेवकपदाचा बजाज यांनी राजीनामा द्यावा - हरिदास पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

सांगली - सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेतील राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक संजय बजाज यांनी पहिल्या अडीच वर्षानंतर राजीनामा देणे अपेक्षित होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अन्य कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी त्यांनी पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याकडे तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी नगरसेवक हरिदास पाटील यांनी आज केली. स्वीकृत नगरसेवकपदासाठी स्वतः इच्छुक असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष श्री. बजाज यांच्याविरोधात पक्षातील एक गटांने नगरसेवक पदावरून हटवण्यासाठी एकी केल्याचे चित्र दोन महिन्यांपासून आहे.  राष्ट्रवादीच्या सांगली विधानसभा क्षेत्र कोअर समितीची घोषणा करताना राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील यांनीही श्री. बजाज यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी दोनच दिवसांपूर्वी केली.  माजी नगरसेवक श्री. पाटील म्हणाले, ‘‘महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी केली आहे. चार वर्षापूर्वी स्वीकृत नगरसेवकपदी निवड करताना बजाज यांनी अडीच वर्षानंतर राजीनामा देण्याचे ठरले. मात्र मध्यंतरीच्या बाजार समिती, जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक निवडणूक आणि अन्य कारणांमुळे त्यांचा राजीनामा घेण्याचे राहिले. मी आमदार जयंत पाटील यांच्याकडे त्यांचा राजीनामा घेवून मला स्वीकृत नगरसेवक करा अशी मागणी केली. 

ती त्यांनी मान्यही केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सांगलीवाडी व परिसरातील भागात राष्ट्रवादीला चांगले यश मिळण्यासाठी मला संधी द्या अशी मागणी केली आहे.’

Web Title: Bajaj of the municipal council should resign