बालाजी अमाईन्सला "फिकी'चा पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

रसायन उद्योगातील योगदानाबद्दल झाला गौरव 

सोलापूर : सोलापुरातील अग्रगण्य बालाजी अमाईन्स या कंपनीला भारतीय रसायन उद्योगातील योगदानाबद्दल 2019 मधील उत्कृष्ट नेतृत्व हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. मुंबई येथे सोमवारी झालेल्या कार्यक्रमात कंपनीचे अध्यक्ष ए. प्रताप रेड्डी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

बालाजी अमाईन्स कंपनीने आपल्या स्वतःच्या संशोधन आणि विकासात आघाडी घेतली आहे. नावीन्यपूर्ण संशोधनाच्या आधारे जागतिक दर्जाच्या उत्पादनांची निर्मिती विविध प्रकल्पांतून होत आहे. मुख्यतः ही उत्पादने रंग, रसायने, रबर, कीटकनाशके, पशुखाद्य आणि औषधे यामध्ये वापरली जात आहेत. भारतीय बाजारपेठेत या उत्पादनांचा मोठा पुरवठा हा बालाजी अमाईन्सकडून होत असून जवळपास 45 देशांना निर्यात होत आहे. 

रसायन उद्योगातील यशस्वी वाटचाल ही कंपनीच्या सातत्यपूर्ण अथक परिश्रमामुळे झाली आहे. हा पुरस्कार आमच्यासाठी गौरवास्पद आहे. याचे श्रेय आम्ही कंपनीचे व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना देतो, असे कंपनीचे अध्यक्ष ए. प्रताप रेड्डी यांनी सांगितले. 
-- 
बालाजी अमाईन्स कंपनीने नावीन्यपूर्ण संशोधन आणि विस्तारीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे यशस्वी वाटचाल चालू आहे. कंपनी सोलापुरातील आपल्या नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक करीत आहे. 
- राम रेड्डी, 
व्यवस्थापकीय संचालक, बालाजी अमाईन्स


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balaji Amines 'FICCI Award'