सोलापूर : राजकारणात शब्दांवरचा विश्वास उडाला - बाळासाहेब शेळके

Balasaheb Sheke was upset with the appointment of the Guardian Minister as a Speaker of market committee in Solapur
Balasaheb Sheke was upset with the appointment of the Guardian Minister as a Speaker of market committee in Solapur

सोलापूर : 'राजकारणात दिलेले शब्द पाळले जात नाहीत, याचा अनुभव मला आज आला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीबाबत जे ठरले होते ते झाले नाही. बाजार समितीत आम्ही मिळून आहोत परंतु कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन दक्षिण सोलापूर तालुक्‍याच्या हिताचा निर्णय पुढील काळात घेऊ,' अशी माहिती बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके यांनी दिली. 

काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या सोलापूर बाजार समितीवर आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची सभापती म्हणून बिनविरोध निवड झाली. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या पदासाठी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके इच्छुक होते. शेळके यांच्या ऐवजी पालकमंत्री देशमुख यांना आयत्यावेळी संधी मिळाल्याने सोलापूर काँग्रेसमध्ये आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघातून सुशीलकुमार शिंदे यांचा दारुण पराभव झाल्यानंतर आता विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसमधील दुफळी आणखी वाढल्याची चिन्हे दिसत आहेत. 


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com