विखे आले की म्हसणवट्या पुढाऱ्यांना स्फुरण चढते : थोरात

Balasaheb Thorat
Balasaheb Thorat

नगर - खालच्या पातळीवरचे भाषण ही संगमनेरची संस्कृती नाही. लोणीचे विखे संगमनेर परिसरात आले, की या भागातील दहावे व अंत्यविधीमध्ये भाषणे करणा-या म्हसणवट्या पुढाऱ्यांना स्फुरण करते, अशी टीका माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

निमोण (ता. संगमनेर) येथे डाॅ. विखे यांनी थोरात यांच्यावर गेल्या आठवड्यात टीका केली होती. त्याच गावात काल सायंकाळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात थोरात यांनी विखे यांच्यावर पलटवार केला. अध्यक्षस्थानी बाजीराव खेमनर होते. आमदार सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे या वेळी उपस्थित होते.

त्यांचा विंचू चढवायचा कार्यक्रम सुरूच
थोरात म्हणाले, ``गेल्या ३५ वर्षांत असे खालच्या पातळीचे भाषण आपण ऐकले नाही. पुढील काळात वडीलधाऱ्यांना असे ऐकण्याची वेळ येऊ देऊ नये. आपण कधीच काही चुकीचे केले नाही. उसाला अडीच हजार रुपये `एफआरपी` दिला. मात्र, त्याची भणभण आमच्या इथं काढली. `त्यांचा` विंचू चढवायचा कार्यक्रम सुरूच आहे. चांगले चाललेले मोडून काढायचा त्यांचा उद्योग असतो. काॅंग्रेसच्या सर्वोच्च बाॅडीचा मी सदस्य आहे, पण पोरगं इथं येऊन बोलतंय कसं. आपण अन्नात माती कालवायचे काम केले नाही. मात्र, म्हणसवट्याच्या पुढाऱ्याला ते कळत नाही. केवळ म्हसणवटयात भाषणे करणा-या या स्वयंघोषित पुढा-यांबरोबर दोन-चार लोकही नसतात. तरीही त्यांना विखे आले की स्फुरण चढते. भाषणेच करायची असतील तर त्यासाठी आमचे लोक ऐकायला पाठवितो.’’

देशात भाषणांचा भूलभुलैय्या
``निळवंड्याच्या कामाला गती देऊन २०१२ मध्ये पाणी अडविले. बोगद्यांची तीस टक्के कामे केली. मधुकर पिचड सोडून या कामी कोणीही मदत केली नाही. ५०० कोटी रुपये साईबाबा संस्थानने दिले, मात्र त्याला स्थगिती मिळाली. कोर्टाच्या बाबतीत ही मंडळी प्रसिद्ध आहे. मात्र, आम्ही करतो ते प्रामाणिकपणे करतो. तुम्ही कोणाच्या दिशाभुलीला बळी पडून नका.सर्वत्र वाहिन्या एका उद्योजकाकडे आहेत. त्यामुळे देशात भाषणांचा भूलभुलैय्या सुरू आहे. लोकांनी त्यांना बहुमत देऊनही राममंदिर बांधलं नाही. केंद्रात व राज्यात असा बनवाबनवीचा कार्यक्रम सुरू आहे,`` असा आरोप थोरात यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com