मोहन जोशी यांना बालगंधर्व पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

सांगली - नागठाणे येथील बालगंधर्व स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या बालगंधर्व पुरस्कारांची घोषणा समितीच्या वतीने करण्यात आली. यंदाचा नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना, तर नटसम्राट बालगंधर्व युवा पुरस्कार नाट्य व चित्रपट अभिनेते सुबोध भावे यांना जाहीर झाला आहे. जूनमध्ये नागठाणे येथे होणाऱ्या समारंभामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख एकावन्न हजार व सन्मानचिन्ह असे नटसम्राट बालगंधर्व पुरस्काराचे, तर रोख पंचवीस हजार व 
सन्मानचिन्ह असे नटसम्राट बालगंधर्व युवा पुरस्काराचे स्वरूप आहे.

Web Title: BalGandharva Award for Mohan Joshi