कोल्हापूर : बालिंगा पाणी उपसा केंद्र सुरु; सी डी वॉर्डाला दिलासा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - युद्धपातळीवर राबविलेल्या दुरुस्तीच्या मोहिमेमुळे अखेर बालिंगा उपसा केंद्र सुरू करण्यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यश आले. उद्या (ता. 14) पासून बालिंगा व केंद्रातून पाणी उपसा सुरू करण्यात येणार आहे. परिणामी किमान सी व डी वॉर्डातील नागिरकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान नागदेववाडी व शिंगणापूर उपसा केंद्रात पाणी असल्याने पंपांची दुरुस्ती लांबणीवर पडली आहे. 

कोल्हापूर - युद्धपातळीवर राबविलेल्या दुरुस्तीच्या मोहिमेमुळे अखेर बालिंगा उपसा केंद्र सुरू करण्यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यश आले. उद्या (ता. 14) पासून बालिंगा व केंद्रातून पाणी उपसा सुरू करण्यात येणार आहे. परिणामी किमान सी व डी वॉर्डातील नागिरकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान नागदेववाडी व शिंगणापूर उपसा केंद्रात पाणी असल्याने पंपांची दुरुस्ती लांबणीवर पडली आहे. 

नागरिकांना पिण्यासाठी सुमारे शंभर टॅंकरद्वारे पाणीपुरवठा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक प्रभागात एक अथवा दोन प्रभागात एक या पद्धतीने टॅंकरचे नियोजन सुरू आहे. टॅंकरने सुमारे 5 ते 6 फेऱ्या केल्या जात आहे. पालिका व इतर खासगी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टॅंकरची संख्या वाढल्याने आता वादावादी, भांडणाचे प्रकार तुलनेने कमी होत आहे. शिंगणापूरजवळचे पुराचे पाणी अद्याप ओसरलेले नाही, त्यामुळे येथून पाणीपुरवठा करण्यास अद्याप विलंब झाला आहे. 

दरम्यान, शहरात चार ते पाच दिवसापासून टॅंकरव्दारे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. कांही विशिष्ट नगरसेवकांच्याकडेच टॅंकरचा ताबा होता. पण दोन दिवसापासून याचे योग्य नियोजन केले आहे. आता टॅंकरची संख्याही वाढली आहे. प्रत्येक प्रभागाला एक टॅंकर देण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार आहे.पुणे येथून 20 आणि सोलापूर येथून 2 टॅंकर येणार आहेत. सध्या एका अथवा दोन प्रभागात एक टॅंकर आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी करनिर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे, विजय वणकुद्रे आदी अधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली आहे. 

आयुक्त डॉ. एम. एस. कलशेट्टी, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी,शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंते यांच्यासह महापालिका अधिकारी ,कर्मचारी या कामात व्यस्त आहेत. 

संस्था, कार्यकर्तेही सक्रिय 
कळंबा फिल्टर हाउस, शिवाजी विद्यापीठ येथून पाणीपुरवठा केला. अनेक सामाजिक संस्था, कार्यकर्तेदेखील पाणीपुरवठा करण्यात सक्रिय आहेत. अनेक वाहनांतून बॅरेल, टाक्‍या भरुन नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्यांच्याकडे कूपनलिका आहेत. त्यांनी शेजारच्या लोकांना पाणीपुरवठा केला आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखीन तीन ते चार दिवस हे वेळापत्रक असेच पुढे ठेवावे लागणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balinga water pumping station starts Kolhapur