सांगलीत जत्रा-मेळाव्यांवरील बंदी 31 मार्चपर्यंत कायम 

Ban on fairs in Sangli till March 31
Ban on fairs in Sangli till March 31

सांगली : राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील टाळेबंदीची मुदत आणखी 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आधीच्या आदेशांना मुदतवाढ देतानाच काही नवे निर्बंध लागू केले आहेत. 

नव्या निर्बंधामध्ये जिल्ह्यातील जत्रा, यात्रा, मेळावे यावरील बंदी आदेश कायम राहील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध कायम राहतील. तसेच इतर मेळावेही प्रतिबंधित असतील. विवाह कार्यक्रमासाठी 50 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित येण्यास प्रतिबंध असेल. तथापि याशिवाय यापूर्वी आदेशाने बंदी अथवा सूट देण्यात आलेल्या क्रिया-बाबी कायम राहतील.

सूट देण्यात आलेल्या आस्थापनांनी, शासनाने त्या-त्या विभागासाठी, आस्थापनांसाठी नेमून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन बंधनकारक राहील. अशा कार्यालयात वावरणाऱ्या सर्व व्यक्तींनी पूर्ण वेळ मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर याबाबतची बंधने पाळली पाहिजेत.

या आदेशाची अंमलबजावणी पोलिस अधीक्षक, तालुका कार्यकारी दंडाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी, असेही बंदी आदेशात स्पष्ट केले आहे. नियम मोडणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार संबंधितांना आहेत. 

अकरा दिवसांत 12 लाखांचा दंड 
गेल्या 20 फेब्रुवारीपासून जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्या सहा हजार 25 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 12 लाख 16 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. पंधरा मंगल कार्यालये, चार शॉपिंग मॉल्स, एक धार्मिक कार्यक्रम, 27 उपाहारगृहांवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात आली असून यापुढेही ही मोहीम सुरुच राहील असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com