जामखेडमध्ये कडकडीत बंद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

काल (ता. 28) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जामखेडमधील बाजार समिती कॉम्प्लेक्‍ससमोर पिस्तुलातून गोळ्या झाडून या दोघांची हत्या करण्यात आली होती.

जामखेड - राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस योगेश राळेभात व युवक कार्यकर्ते रॉकी ऊर्फ राकेश राळेभात यांच्या दुहेरी हत्येप्रकरणी आज जामखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

काल (ता. 28) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जामखेडमधील बाजार समिती कॉम्प्लेक्‍ससमोर पिस्तुलातून गोळ्या झाडून या दोघांची हत्या करण्यात आली होती. त्यांना नगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्या दोघांचाही मृत्यू झाला असल्याचे रुग्णालयातर्फे सागंण्यात आले. त्यानंतर दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. दरम्यान जामखेडमध्ये आज तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जामखेड येथे उद्याही बंद पुकारण्यात आला आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Bandh in Jamkhed