चाळीस तोळे सोने घेऊन बंगाली कारागीर पसार 

crime
crime

सोलापूर : दागिने बनविण्यासाठी दिलेले चाळीस तोळे सोने घेवून तिघे बंगाली कारागीर पसार झाले आहेत. याप्रकरणी सराफ बाजारातील प्रदीप श्रीपाद वेर्णेकर (वय 55, रा. उत्तर कसबा, सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलिसात फिर्यादी दिली आहे. तिघांनी 2 लाख 84 हजार 938 रुपयांचे दागिने नेवून फसवणूक केली आहे. 

बंगाली कारागीर अकबर मन्सूर शेख, त्याचा भाऊ सैदूल व फरदीन अशी आरोपींची नावे आहेत. वेर्णेकर यांचे सराफ बाजारात श्रीपाद ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून ओळखीच्या असलेल्या बंगाली कारागीर शेख यांच्याकडे सोने देवून दागिने बनवून घेतले जात होते. 4 ते 26 मे 2019 या कालावधीत अबकर व त्याच्या भावांकडे 401.630 ग्रॅम सोने दागिने बनविण्यासाठी दिले होते. दुकानातील कामगार आणि वेर्णेकर यांचे भाऊ अधुनमधून शेख यांच्या दुकानी जावून कामाची माहिती घेण्यासाठी जात होते. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता वेर्णेकर यांचा कामगार महेश हलकुड हा कुंभारवेस येथील अकबर शेखच्या दुकानी गेला. दुकान उघडे दिसले मात्र तिथे कुणीही नव्हते. आजूबाजूला चौकशी केली, मात्र ते सापडले नाहीत. त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला मात्र तिघेही सापडले नाही. दागिने बनविण्यासाठी दिलेले सोने घेऊन तिघे निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन साळुंखे तपास करीत आहेत. 

गेल्या पंधरा वर्षांपासून बंगाली कारागीर अकबर शेख हा सराफ वेर्णेकर यांना दागिने बनवून देत होता. तिघा भावांचा शोध सुरु आहे. वेर्णेकर यांच्याप्रमाणे इतरही सराफांची फसवणूक झाली असण्याची शक्‍यता आहे. 
- संजय जगताप, पोलिस निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com