Bangalore : विविध भरती घोटाळ्यांमुळे २५ लाख तरुण संकटात

काँग्रेसचा भाजप सरकारवर गंभीर आरोप
विविध पदांची भरती! 'या' तारखेपर्यंत करा अर्ज
विविध पदांची भरती! 'या' तारखेपर्यंत करा अर्जSakal

बंगळूर : भाजप सरकारच्या काळात झालेल्या विविध नोकरभरती घोटाळ्यांमुळे राज्यातील २५ लाख तरणांचे भविष्य संकटात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या पदवीधर तरुण समाजाच्या आशा मावळल्या आहेत. पीएसआय परीक्षा देणारे ५४ हजार उमेदवार भरती घोटाळ्याचे बळी ठरले आहेत.

विविध पदांची भरती! 'या' तारखेपर्यंत करा अर्ज
Pune News : पुणे महापालिकेच्या दवाखान्यात घटसर्प-धनुर्वाताच्या लसीचा तुटवडा

पीएसआय, केएमएफ, केपीटीसीएलसह सर्वच ठिकाणी नोकऱ्या विकल्या जात आहेत. पात्रतेनुसार नोकरी मिळत नाही, पदवीधर युवक वर्ग हवालदील झाला आहे. राज्यातील कार्यक्षम मनुष्यबळाचा वापर न होता वाया जात आहे. काँग्रेसने यासंदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलले असून तरुणांमध्ये आशा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे म्हटले आहे.

भाजप सरकारने आरक्षणाबाबत पंचमसाली लिंगायत आणि वक्कलिगांच्या कानावर फुले घातली आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे फुलवाले आहेत. ते उदार हस्ते सर्वांच्या कानात फुले घालतील, अशी खिल्लीही काँग्रेसने उडवली.

चन्नगिरीत भाजपची ‘यू-टर्न’ संकल्पयात्रा सुरूच आहे. भाजप नेत्यांना त्या मतदारसंघात विरोध झाल्याने यात्रा काढता आली नाही. परिणामी त्यांना खाली हात आणि परतावे लागले. भाजपच्या कार्यकर्त्यांनीच यात्रेला रोखल्याने भाजप विरुद्ध भाजप संघर्ष आणखी एका पातळीवर पोचला आहे, अशी टीका काँग्रेसने केली.

विविध पदांची भरती! 'या' तारखेपर्यंत करा अर्ज
Satara : ‘मराठवाडी’त केवळ १८ टक्के पाणीसाठा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com